नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आज नाशिकच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्व बांधकाम ठेकेदारांचे जे देयके अडकलेली आहेत ते शासन स्तरावर त्वरित निकाली निघावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
राज्यस्तरावर नऊ हजार कोटींची देयके ही ठेकेदारांची अडकलेली असून त्यात नाशिक जिल्ह्याची ५७५ कोटी इतकी देयके अडकलेली आहे. ही बिले त्वरित निकाली निघावी आणि त्यानंतरच नवीन निविदा शासनाने काढाव्या अशी मागणी बिल्डर असोसिएशन कडून करण्यात आली आहे. शासनाकडे जर निधी उपलब्ध नसेल तर नवीन निविदा काढूच नये अशी मागणी यावेळी ठेकेदारांनी केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी बिल्डर असोसिएशनने दिला आहे.
असोसिएशनच्या मागण्या अशा
१)मार्च २०२३ पर्यंतची सर्व ठेकेदारांच्या थकीत बिलाची संपूर्ण रक्कम त्वरीत अदा करावी
२) मार्च २०२३ पर्यंतची सर्व बिले अदा झाल्यानतंरच पुढील बिले अदा करावीत.
३) शासनाकडे निधी नसेल तर नवीन निविदा काढण्यात येऊ नयेत.
या प्रसंगी बिल्डर्स असोशियन अॅाफ इंडीया नासिक सेंटरचे अध्यक्ष विजय बाविस्कर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, नासिक बी ए आय चे माजी अध्यक्ष अभय चोक्सी, राहूल सुर्यवंशी, उपाध्यक्ष मनोज खांडेकर, सचिव प्रशांत सोनजे, राजेंद्र मुथा, विलास निफाडे, रमेश शिरसाठ, गजानन काटकर, सुधाकर मुळाणे, मदन जगोटा, जितूभाई शहा, भाऊसाहेब सांगळे, राजूशेठ गोठी, राजाभाऊ कुर्हाडे, संदीप दरगोडे व इतर संघटनाचे पदाधिकारी हजर होते