विशेष प्रतिनिधी, नाशिक
शहर परिसरात सध्या एकच चर्चा आहे ती कपडो काढो आंदोलनाची. खासगी हॉस्पिटलकडून होणाऱ्या लुटी विरोधात आपचे कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी सुरू केलेल्या मिशन हॉस्पिटलमध्ये आज वोक्हार्ट हॉस्पिटल येथे आंदोलन करण्यात आले. भावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलने घेतलेले ज्यादा पैसे परत करण्यासाठी विनवणी करण्यात आली. पण, हॉस्पिटलने मान्य केले नाही. अखेर आमच्या आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या अंगावरील कपडे आम्ही देतो. ते कपडे विका आणि तुमचे अजून पैसे वसूल करा, असा पवित्रा या मिशनमध्ये घेण्यात आला. याअंतर्गत भावे आणि रुग्णाच्या नातेवाईकाने आपला शर्ट आणि पँट हॉस्पिटलमध्येच आंदोलनावेळी काढली. त्यानंतर हॉस्पिटलने अवघ्या १० मिनीटातच १ लाख ४० हजार परत केल्याची माहिती भावे यांनी दिली आहे. रुग्णांवर खर्च न केलेल्या साधनांची आणि आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली हॉस्पिटल भरमसाठ वसुली करीत असल्याच आरोप भावे यांनी केला आहे.
व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा