नाशिक – मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष व नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीन नाशिक महसूल आयुक्त कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. वनधिकारी कायदयाची काटेकोर अंमलबजावणी, करण्यात यावी, वनजमिनीचे चुकीच्या पध्दतीने अपात्र ठरवलेले दावे तात्काळ पात्र करावे यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. माजी आ. जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.