मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात झालेल्या भूकंपाचे धक्के आता शमले असले तरी आता पुन्हा एकदा नवा भूकंप होणार का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ज्या शिवसेनेत फूट पाडून स्वतंत्र झालेला शिंदे गट हा आता भाजपपासून पुन्हा बाहेर पडणार का, अशा शक्यतांचे काहूर माजले आहे. तसे झाले तर राज्याच्या राजकारणात आणखी मोठी खळबळ माजणार आहे.
राजकारणात कुणी कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार येत आहे. एकेकाळी भाजप शिवसेना युतीचे अतूट नाते होते. परंतु त्यांची युती तुटली कालांतराने विधानसभेच्या निवडणुका होऊन कोणत्याच पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळाले नाही. त्यामुळे कोणाचे सरकार होणार याची चढाओढ सुरू असताना अचानकपणे एके दिवशी पहाटे भाजप आणि राष्ट्रवादी यांचे सरकार बनवून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाली, परंतु ही निवड ब त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही काही तासातच ते सरकार कोसळले , त्यानंतर महाविकास आघाडी चे सरकार स्थापन होऊन त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष सामील झाला.
मात्र अडीच वर्षे संपत नाही तोच पुन्हा एकदा शिवसेनेमधील एक गट फुटून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस भाजपचे देवेंद्र फडणवीस विराजमान झाले, म्हणजे शिवसेना गट आणि भाजप एकत्र आले अशाप्रकारे जणू काही खो-खोचा खेळ राजकारणात सुरू आहे, त्यामुळेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात गंभीर भाजपवर गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. मात्र आज भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या काही ट्विटवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर तिसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा नंबर लागणार असल्याचे कंबोज यांनी ट्विट केले आहे. तसेच या नेत्याविरोधात पुरावे सादर करण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या सर्व घडामोडीवरून भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे गट आता भाजपसोबत सरकारमध्ये तर आहे, मात्र असमाधानी असल्यामुळे तो कधीही बाहेर पडेल, असी भीती भाजपला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव टाकून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्लॅन बी भाजपतर्फे आखला जात असल्याचा गौप्यस्फोट दमानिया यांनी केला आहे.
मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याविरोधात चौकशीसत्र सुरू झाल्यास यामागे भाजपचा नेमका काय हेतू आहे, यावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘भाजपला अजित पवार आणि फडणवीस यांचे सरकार स्थापन करायचे होते. त्यावेळी सिंचन घोटाळ्यात त्यांना क्लीन चिट देण्यात आली. मोहित कंबोज यांना पुढे काय होणार याची माहिती कशी मिळते?
किरीट सोमय्यांना निवृत्त करून भाजपने आता मोहित कंबोज यांना पुढे केल्याचे दिसत आहे. भाजपला सध्याच्या सरकारमधून शिंदे गट बाहेर पडण्याची भीती वाटत आहे. यासाठीच भाजपचा हा प्लॅन बी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून त्यांना सोबत घ्यायचा भाजपचा विचार आहे. भाजप कुणाचीही फाईल हवी तेव्हा उघड करते, हवी तेव्हा बंद करते. विरोधी पक्षाला गप्प करण्याचा आणि अजित पवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपकडून हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अंजली दमानि यांनी केला.
तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारलेला एकनाथ शिंदे गट आता भाजपसोबत सरकारमध्ये तर आहे, मात्र असमाधानी असल्यामुळे तो कधीही बाहेर पडेल, असी भीती भाजपला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव टाकून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्लॅन बी भाजपतर्फे आखला जात असल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलंय. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांच्यानंतर पाचवी जागा रिकामी ठेवत अपना स्ट्राइक रेट 100% है… असं ट्विट कंबोज यांनी केलंय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याची पोलखोल पत्रकार परिषदेमार्फत करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत. त्यामुळे तपास यंत्रणांची सुई आता कुणाकडे वळणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Again Political Crisis Again Shivsena Politics Shinde Group
Eknath Shinde Uddhav Thackeray Politics Anjali Damania BJP