नाशिक – गुलाब वादळामुळे राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे. त्यात नाशिक शहरासह जिल्ह्याचाही समावेश आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. ३ हजार क्युसेक्स एवढा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या पोटापर्यंत पाण्याची पातळी असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या नाशिकला रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर राहिल्यास गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गोदावरीच्या पुराचा बघा हा व्हिडिओ