नवी दिल्ली – कोरोना विषाणू आणखी काय दिवस दाखवणार आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. कोरोना होऊन गेलेल्या लोकांमधील बेफिकीरी वृत्ती वाढली आहे. आपल्याला आता पुन्हा बाधा होऊच शकत नाही, असे समजणार्या लोकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. अशीच चिंता वाढवणारी ही बातमी आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रभाव थोडा वेगळा दिसू लागला आहे. या बहुरूपी विषाणूसमोर शरीरातील अँटीबॉडी दीर्घकाळ आपल्याला सुरक्षित ठेवू शकत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लोकांना दुसऱ्यांदा संसर्ग होऊ लागला आहे.
आयसीएमआरच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ४.५ टक्क्यांहून (पाच लाख) अधिक लोकांना एकाहून अधिक वेळा कोरोनाची बाधा झाली आहे. जागतिक स्तरावर दुसर्यांदा संसर्ग होण्याचा दर जवळपास एक टक्का आहे. संसर्गग्रस्त लोकांमध्ये विकसित होणार्या अँटीबॉडीबाबत तज्ज्ञांना प्रथमच यश आले आहे. त्यांच्यानुसार, चारपैकी एक व्यक्तीमध्ये १५० दिवसांत अँटीबॉडी टिकू शकल्या नाहीत. बाधा झाल्यानंतर ६० दिवसांनंतर त्या लोकांचा प्लझ्मा सुद्धा हळूहळू निकामी झाला आहे. भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावाची सरकारी आकडेवारीपेक्षाही अधिक गंभीर स्थिती असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सीएसआयआरच्या तज्ज्ञांनी राष्ट्रीय स्तरावर एक सीरो सर्वेक्षण केले. देशाच्या अनेक भागात विषाणूचा स्थानिक प्रादुर्भाव झालेला आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर लोक संक्रमित झाले आहेत, असे त्या सर्वेक्षणात आढळले आहे. शरीरातील अँटीबॉडी कमी होऊ शकतात याचाच अर्थ दीर्घकाळ कोरोनापासून स्वतःला वाचवणे शक्य नाही. त्यामुळे देशात कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. देशात पुन्हा कोरोनाची बाधा होणार्यांची संख्या वेगाने वाढत आहे, असे आयसीएमआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
३० टक्के लोक अनभिज्ञ