मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेदांत-फॉक्सकॉनच्या पावणेदोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्प पाठोपाठ आता रायगडमध्ये होणारा तीन हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क प्रकल्प गुजरातला होणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ७० ते ८० हजारापेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार होता. मात्र खोके सरकरमुळे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात जात आहेत. महाराष्ट्राला हा आता दुसरा प्रचंड नुकसानीचा मोठा धक्का बसला आहे, असा आरोप युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे केला आहे.
ठाकरे पुढे म्हणाले की, बल्क ड्रग पार्क’बाबत आमचा प्रस्ताव असा होता की, महाराष्ट्रातून जो औषधांचा पुरवठा होतो तो २० टक्के आहे. यामध्ये सर्वात मोठा लस उत्पादक प्रकल्प सीरम इन्स्टिट्यूट आणि इतर ते महाराष्ट्रात आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट ग्लोबल अॅप्रुव्ह प्लान्ट हे महाराष्ट्रात आहेत. तसेच औषध निर्यातीत नीती आयोगाच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. इतकं सगळ असताना महाराष्ट्रातील ‘बल्क ड्रग पार्क’चा प्रकल्पही महाराष्ट्रातून निघून जातो. मला याचं आश्चर्य वाटतंय की ज्या प्रकल्पांवर आम्ही मेहनत घेतली. आपल्या महाराष्ट्रात हा प्रकल्प खेचून आणण्याचा जो प्रयत्न केला. या नव्या सरकारनं ते पळवून लावलं आहे.
आज (१५ सप्टेंबर) राज्यभरात युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे.वेदांत आणि फॉसकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधात सरकारचा निषेध म्हणून युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला, यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात निषेध मोहीम घेण्यात येणार आहे.
‘शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने आम्ही आज राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करणार असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले.’ वेदांता प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून राज्यात येणारा वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? सरकारकडून अद्याप याचं उत्तर मिळालं नसल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे. ४० आमदारांसोबत राज्यातील २ प्रकल्पही पळवले. जीत कर हारने वाले को खोके सरकार कहते है, असं म्हणत बल्क ड्रग पार्क प्रकल्पावरुनही आदित्य ठाकरेंनी मोठा आरोप केला आहे.
रायगडमधील बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडे नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडे नेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.रायगडमध्ये होणारा तीन हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क प्रकल्प गुजरातला होणार आहे. प्रकल्प पळवले जात आहेत कारण या सरकारचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे ८० हजार रोजगार निघून गेले आहेत. अजून तरूण शांत आहेत पण त्यांचा अंत पाहू नका.
बल्क ड्रग पार्कही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करून आम्ही आणले मग यांना का जमत नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालण्याचा प्रकार सूरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांताचा एकेरी उल्लेख करत विधानसभेत सांगितलं की, चार लाख कोटींचा प्रस्ताव ते घेऊन आले. २ लाख कोटींच्या प्रकल्पाला चार लाख कोटी सांगणं, हे कोणत्या सरकारला शोभणारं आहे. २ लाख कोटी आणि १ लाख रोजगार उपलब्ध करून देणार प्रकल्प गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता,” असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
वेदांत-फॉक्सकॉनचा मोठा प्रकल्प गमावल्यानंतर मविआ सरकारने पाठपुरावा केलेला बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प ही खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे तसेच राज्याच्या विकासात या सरकारचे स्वारस्य नसल्यानेच गुजरात, आंध्र, हिमाचल प्रदेशकडे गेला. pic.twitter.com/R2ESBmeOZs
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 14, 2022
महाराष्ट्रातून बल्क ड्रग पार्क गुजरातला गेलाय हे सध्याच्या उद्योग मंत्र्यांना माहिती आहे का? वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला, याचे उत्तर अद्यापही मिळाले नाही. जेव्हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात होता, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती दर्शनात व्यस्त होते. आता नवरात्र येणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गरबा, दांडियासाठी न फिरता थोडेसे लक्ष द्यावे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला
‘बल्क ड्रग पार्क’साठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारशी पत्र व्यवहार केला होता. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. रायगडमध्ये हा प्रकल्प होता. हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी प्रस्ताव पाठवले होते. यात गुजरात कुठेच शर्यतीत नव्हता. पण आता हा प्रकल्प गुजरातमधील भरुच इथं होणार आहे. या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्रानं पहिल्यांदा केली असताना हा प्रकल्प गुजरातला कसा गेला? याचे उत्तर द्यावे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की,आमच्या सरकारने सर्व सवलती देऊ केल्या होत्या. मात्र आधीचे सरकार दोन वर्षे प्रतिसाद देण्यास अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर उदयोगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले, मुख्यमंत्री शिंदे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले असून महाराष्ट्राला यापेक्षाही मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन पंतप्रधानानी दिल्याचा दावा सामंत यांनी केला.
Again Big Bulk Drug Project Lost Maharashtra
Industry Development