नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लस आल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी केरळमधून एक चिंताजनक बाब समोर येत आहे. केरळ राज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या तब्बल ४० हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे.
एकीकडे देशातील बहुतांश सर्व राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना महाराष्ट्र आणि केरळमध्ये मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. विशेषत : केरळ बाबत विशेष गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र सरकारने देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. केरळमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, केंद्र सरकारने केरळ सरकारकडून सर्व संक्रमित रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग मागवली आहे.
सध्या केरळमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने राज्य सरकारची समस्या वाढवली आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांनी कोरोना लस घेतली आहे, अशांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. एक अहवालानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे, की केरळमध्ये सुमारे ४० हजार लोकांना संपूर्ण लशीकरण झाले असतानाही कोरोनाची लागण झाली.
केरळमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, केंद्र सरकारने केरळ सरकारकडून अशा सर्व संक्रमित रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग मागवली आहे. हे सॅम्पल कोरोनाच्या दुसऱ्या रुग्णांशी जुळवले जातील. लस घेतलेली असतानाही येथे लोक कोरोना संक्रमित होत आहे, हे सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. मात्र, हा डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे अधिकांश रुग्ण येथील पथानामथिट्टा जिल्ह्यात आढळले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंग हा व्हायरसचा एक प्रकारचा बायोडेटा आहे. व्हायरस कसा असतो, तो कसा दिसतो याची माहिती जीनोममधून येते. व्हायरसच्या या प्रचंड गटाला जीनोम म्हणतात. विषाणूबद्दल जाणून घेण्याच्या पद्धतीला जीनोम सिक्वन्सिंग म्हणतात. त्यातूनच कोरोनाचा नवीन ताण कळला आहे. तसेच जीनोम सिक्वेन्सिंग ही व्हायरसबद्दल जाणून घेण्याची पद्धत आहे.
काही महिन्यापूर्वी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन ताण आल्यानंतर भारतही सतर्क आहे. ब्रिटनमधून आलेल्यांमध्ये ११४ लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेंसींगसाठी भारतातील १० वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर कळले की, ६ लोकांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन ताण आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर जीनोम सिक्वेन्सिंग हा विषाणूचा एक प्रकारचा बायोडेटा आहे. व्हायरस कसा असतो, तो कसा दिसतो याची माहिती जीनोममधून येते. व्हायरसच्या या प्रचंड गटाला जीनोम म्हणतात. विषाणूबद्दल जाणून घेण्याच्या पद्धतीला जीनोम सिक्वन्सिंग म्हणतात. त्यातूनच कोरोनाचा नवीन ताण कळला आहे.
केरळमध्ये मंगळवारी सुमारे २१ हजार नवे कोरोना रुग्ण समोर आले. आता राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा ३५ लाख८६ हजारांवर पोहोचला आहे. राज्यातील संक्रमणदर १६ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. येथे गेल्या एक दिवसात कोरोनामुळे १५२ लोकांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांची संख्या आता सुमारे १८,००० एवढी झाली आहे.