भारत बायोटेकने कंपनीचे कर्मचारी कोरोना संक्रमित असूनही देशात या साथीची भयकंर स्थिती लक्षात घेता कंपनीकडून कोव्हॅक्सिनच्या उत्पादना संदर्भात कोणतीही दिरंगाई करण्यात येत नाही. तरीही कोरोनावरील लस कोव्हॅक्सिन उपलब्ध नसल्याच्या काही राज्यांच्या विनाकारण तक्रारी येत असून त्यामुळे भारत बायोटेकने नाराजी व्यक्त केली आहे. याउलट काही तज्ज्ञ डॉक्टरांनी भारत बायोटेक या कार्याला सलाम केला आहे.
भारत बायोटेक कंपनीच्या सह-संस्थापक डॉ. सुचित्रा इला यांनी म्हटले आहे की, १ मे पासून जवळपास १८ राज्यांत कोरोनावरील लस कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात येत आहे. आम्ही लसीचा पुरवठा सुरुळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी सुद्धा काही राज्य आमच्या कामावर प्रश्न उपस्थित करत आहेत, ही गोष्ट निराशाजनक आहे. आमचे ५० टक्के कर्मचारी कोरोनामुळे कामावर येऊ शकत नाहीत. तरीही आम्ही कोरोना साथीमध्ये २४ तास काम करत आहोत, असे ट्विट सुचित्रा इला यांनी केले आहे.
ज्या राज्यांमध्ये भारत बायोटेकची लस पुरवली जाते आहे. त्या राज्यांची नावेही सुचित्रा इल्ला यांनी दिली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तमिळनाडू, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान, यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, तिसऱ्या टप्प्यात होणारी लसीची एकूण निर्मितीचा ५० टक्के हिस्सा केंद्राला तर उरलेला ५० टक्के हिस्सा राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विक्रीचे निर्देश देण्यात आले आहेत.