मुंबई – मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही असं राज्यपाल कोश्यारी असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहे. शिवसेना ,राष्ट्रवादी, कँाग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी राज्यपालाच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. शिंदे गटानेही राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी सांगितले. तर काँग्रेसने राज्यपालांना नारळ द्या असे सांगितले आहे. मनसेने सुध्दा नको त्या गोष्टीवर राज्यपालांनी डोके खुपसू नये असे सांगितले आहे. या विषयावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दुपारी १ पत्रकार परिषद घेणार आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र काढून ते प्रसिध्दीस दिले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लव्हेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या भाषणात राज्यपालांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केले. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे राज्यपालांनी सांगितले.
https://twitter.com/RajThackeray/status/1553258453539635201?s=20&t=KaFE8RMNHSqn-zvKBv6vCw
https://twitter.com/rautsanjay61/status/1553247173684236288?s=20&t=d7KIc7NuHXGHcwDPLlGZmQ
https://twitter.com/supriya_sule/status/1553229577547264001?s=20&t=a4kN66qmuFNKelVoxfho2Q
https://twitter.com/sachin_inc/status/1553074157616635904?s=20&t=TW85elQ6SX0oLh6rlTy3Jg
https://twitter.com/GajananKaleMNS/status/1553227574767001600?s=20&t=0f6F4jLKiI0JV8xhUD3uCw