इंडिया दर्पण करिअर मालेत विजय गोळेसर यांनी ‘दहावी नापासांनो नाउमेद होऊ नका जिद्द सोडू नका’ हा अतिशय महत्त्वाचा विषय घेतला आहे. दहावीचा रिझल्ट जाहिर झाला आहे. यात नेहमी प्रमाणे ९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर ५ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. कमी गुण मिळालेल्या किंवा नापास झालेल्या विद्यार्थांचे सांत्वन कसे करावे? त्यांना पुन्हा उभारी कशी द्यावी याचे प्रात्यक्षिकच या व्हिडिओत सादर केले आहे. विद्यार्थी व पालकांना या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी हे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. दहावीचे विद्यार्थी वयाने लहान असतात, नादान असतात.त्यांना धीर देणे त्यांचे सांत्वन करणे प्रत्येक सुजाण पालकांचे कर्तव्य आहे. हा व्हिडिओ अशा विद्यार्थांना व पालकांना उभारी देईल उत्साह देईल अशी आशा आहे. मार्गदर्शन करीत आहेत विजय गोळेसर (9422765227). बघा हा व्हिडिओ