मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात उन्हाळ्याला प्रारंभ झाला असतानाच अचानक हवामानात बदल झाला आहे. त्यामुळेच राज्याच्या अनेक भागात कालपासून ढगाळ हावामान आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. यासंदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाने यापूर्वीच ढगाळ हवामान आणि पावासाचा इशारा दिला होता. राज्याच्या काही भागात पुढील पाच दिवस ढगाळ हवामान आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या काही भागात पावसाबरोबच गारपीटही होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान व पश्चिम मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. कोकणात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आजही आहे. राज्यात उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. बदलत्या या हवामानामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. रब्बीचा हंगाम काढणीला आला आहे. कांदा, ज्वारीसह अन्य पिके काढणीसाठी आली आहेत. आणि आता पावसाचा अंदाज दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
म्हणून पडतोय पाऊस
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याच्या संगमामुळे आणि Trough in Easterlies यामुळे केरळ किनारा ते कोकण किनार्यापर्यंत हवामानात बदल होणार आहे. येत्या 8 ते 10 मार्च य ाकालावधीत महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश या परिसरात गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच, येत्या 8 ते 9 मार्च दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि 9 मार्च रोजी मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे.
वाऱ्याच्या संगमामुळे व Trough in Easterlies केरळ किनारा ते कोकण किनार्यापर्यंत;
8-10 मार्च: महाराष्ट्र,गुजरात,पू.राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेशात गडगडाटासह/जोरदार वाऱ्यासह,हलका/मध्यम पाऊस शक्यता.8-9 मार्च:उत्तर मध्य महाराष्ट्रात व 9 मार्च:लगतच्या मराठवाड्यात गारपीट शक्यता.
-IMD pic.twitter.com/xDUJ2Z7mPZ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 8, 2022