मुंबई – कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून उद्योग, व्यवसायाबरोबरच चित्रपटगृहे देखील बंद आहेत. परंतु आता राज्य सरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली असून सर्वप्रथम सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक छायाचित्र शेअर केले असून सूर्यवंशी चित्रपटच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे.
रोहित शेट्टीने अलीकडेच सांगितले आहे की, अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे. सूर्यवंशी हा चित्रपट कोरोनाच्या पहिल्या लाटेपूर्वी रिलीज होणार होता, मात्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आणि या चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला.
या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ यांच्यासोबतच अजय देवगण आणि रणवीर सिंग यांची महत्वाची भूमिका आहे. सर्वजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच घोषणा केली की महाराष्ट्रातील चित्रपटगृहे दि. २२ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. दिग्दर्शक रोहित शेट्टी व्यतिरिक्त अनेक प्रमुख प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आमचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.
रोहितची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेक कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय कुमारनेही ट्विटरवर आपला उत्साह शेअर केला आहे. एक चित्र शेअर करत त्यांनी लिहिले, ‘आज अनेक कुटुंबे श्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानतील! येत्या २२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सिनेमागृहे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
बघा या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर