पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील पहिली ते नववीच्या शाळा येत्या ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे शहराने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा येत्या ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याची जाहीर करण्यात आले आहे. पुणे कोरोना आढावा बैठक आज घेण्यात आली. त्यात कोरोनाच्या संसर्ग सद्यस्थितीविषयी चर्चा करण्यात आली. गेल्या आठवड्याभरात पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. म्हणूनच पुण्यातील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.