इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘सूर निरागस हो’……हे स्वर कानावर पडले की सुबोध भावेच्या ‘कट्यार’ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. संगीतप्रेमींसाठी ही अत्यंत अनोखी मेजवानी होती. सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमाने अनेकांच्या मानत स्थान पटकावले आहे. उत्तम दिग्दर्शन, सचिन पिळगावकर, स्वतः सुबोध भावे, पुष्कर शोत्री, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे या सगळ्यांच्या भूमिकेने हा चित्रपट वेगळ्याच उंचीवर गेला. तर शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे यांच्या आवाजाने या चित्रपटाला चार चांद लावले. संगीतमयी चित्रपटाची ही मेजवानी प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडली. ही सगळी चर्चा करण्याची कारण म्हणजे आणखी एका संगीतमयी चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे याने याबाबत घोषणा केली आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत.
कलाकार हा पाण्यासारखा असतो हे सुबोध भावेने दाखवून दिले. पाण्याला ज्यात ठेवलं जातं, त्याचा आकार ते घेते. त्याला साजेसा असा सुबोध आहे. अभिनयात कला म्हणजे सुबोधचा कुणी हात धरणार नाही असेच म्हणावे लागेल. कट्यार काळजात घुसली मधला सदाशिव गुरव असो, की उसमे क्या है म्हणणारा लाल्या, अभिनयात बुडून त्या पात्रात हरवून अभिनय साकारणाऱ्या सुबोधच्या सिनेमाची चाहते नेहमीच प्रतीक्षा करत असतात. त्याने पहिल्यांदाच दिग्दर्शित केलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने तर प्रेक्षकांना वेड लावले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर सुबोध कोणता नवा सिनेमा घेऊन येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती.
एखादं अजरामर नाटक चित्रपट रूपात सुबोध घेऊन येणार का? अशी उत्सुकता प्रेक्षकांना आहे. लवकरच ही उत्सुकता संपणार आहे. अभिनेता सुबोध भावेने आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली आहे. कट्यार काळजात घुसली’… १२ नोव्हेंबर २०१५… एका संगीतमय आनंददायी प्रवासाचे सातवे वर्ष… संगीत माणसं जोडतं आणि आनंद निर्माण करतं… अजून एक आनंददायी संगीतमय प्रवास पुढील वर्षी.. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे एक संगीतमयी चित्रपट येणार मात्र त्यात कोण कलाकार असणार? हा सिनेमा नक्की कसा असणार याबाबत आता प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
After Katyar Kaljat Ghusli Coming Soon This Musical Movie
Marathi