इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणताही मनुष्य दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या भविष्याचा विचार करत असतो. आपण इतके कष्ट करतो, परंतु आपल्या भागात शुभ योग किंवा राजयोग का येत नाही? याचा विचार करत असतो. साहजिकच अनेक जण राशि भविष्य बघतात, परंतु आता काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनात निश्चितच राजयोग येणार आहे, असे दिसून येते.
विशेषतः सण उत्सवाच्या काळात म्हणजेच दिवाळी काळात तीन राशींच्या व्यक्तींच्या जीवनात अत्यंत चांगला काळ येणार आहे, असे मानले जाते. अर्थात यामागे शनि देवाची कृपा असणार आहे. कारण शनि देवाला ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे, कारण ते न्यायाचे देवता आहेत. शनी कर्मानुसार फळ देतो आणि क्षणार्धात एखाद्याचे भाग्यही बदलतो. शनी हा राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतो. २३ ऑक्टोबर रोजी शनीच्या स्थितीत महत्त्वपूर्ण बदल होणार आहे.
शनी सध्या स्वतःच्या राशीत मकर राशीत पूर्वगामी म्हणजेच भ्रमण करीत आहे, त्यामुळे २३ ऑक्टोबरपासून त्याचे संक्रमण होणार आहे. शनीच्या चालीतील बदलामुळे ३ राशींमध्ये पंच महापुरुष राज योग तयार होईल, जो अत्यंत शुभ मानला जातो. हा महापुरुष राज योग काही राशीच्या व्यक्तींना भरपूर पैसा आणि प्रगती देणार आहे.
मेष :
मेष ही प्रथम रास असून मकर राशीत शनिदेवाच्या संक्रमणाने मेष राशीत पंच महापुरुष राज योग तयार होईल. यामुळे या लोकांना करिअर आणि पैशाच्या बाबतीत विशेष फायदा होईल. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते किंवा विद्यमान नोकरीतच पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात मोठा नफा होईल. व्यवसाय वाढेल. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. त्यामुळे अनेक जण तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकतात.
धनु:
विशेषतः मार्गी शनि धनु राशीच्या लोकांनाही खूप शुभ फल देईल. आतापर्यंत करिअरमध्ये ज्या प्रगतीची तुम्ही वाट पाहत होता, आता तुम्हाला ते यश मिळणार आहे. पगार वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. व्यवसायातही फायदा होईल. नफा वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापार, व्यवसायाशी संबंधित नागारीकांना विशेष फायदा होणार आहे.
मीन:
महत्त्वाचे म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या प्रत्यक्ष हालचालीमुळे मीन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. वाढीव उत्पन्नामुळे दिलासा मिळेल. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग गावसतील. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. नवीन संपर्क व्यवसाय वाढवण्यास मदत करतील. कार-मालमत्ता खरेदी योग दिसून येत आहे.
After Diwali Three Signs Horoscope Astrology