इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनाचा धोका निवळला असला तरी आता मात्र, एक गंभीर बाब समोर आली आहे. कोरोनानंतर अन्य गंभीर आजारांची संख्या वाढत आहे. त्यात विशेषतः क्षयरोग हा आजार जास्त फैलावत आहे. यामुळे आरोग्य तज्ज्ञही चक्रावले आहेत. खासकरुन मुंबईत क्षयरोगाचे बाधित मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या २ वर्षात क्षयरोगाचे तब्बल ६० हजारापेक्षा अधिक जास्त रुग्ण आढळले आहेत तर १४ हजाराहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे ही बाब चिंता वाढविणारीच आहे.
देशात कोरोनाचे थैमान कमी होत आहे. मात्र या रुग्णांच्या संख्येने तब्बल ४ कोटींचा टप्पा पार केला आहे. लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. आता देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता इतरही आजारांनी डोके वर काढले आहे. एका आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे २८ ते ३० लाख लोक क्षयरोगाने बाधित होतात. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत जगाला क्षयमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अशा परिस्थितीत माहितीचा अभाव किंवा उपचारांची अनुपलब्धता हा या मार्गातील मोठा अडथळा ठरू शकतो. क्षयरोग वृद्धांना होतो अशी पूर्वीची धारणा होती. मात्र लहान वयातही लाखो रुग्ण या आजाराच्या विळख्यात येत आहेत. क्षयरोगाचा सामान्यतः फुफ्फुसांवर परिणाम होतो, परंतु हा आजार शरीराच्या इतर भागातही होऊ शकतो.
सर्व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा म्हणून सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. विविध उपाययोजना या सातत्याने करण्यात येत आहे. पण असं असताना कोरोनामुळे टीबीचा धोका वाढला असून टीबी रुग्णांची संख्या वाढली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या दोन वर्षांत टीबीचे ६० हजार ५७९ रुग्ण आढळले आहेत, तर १४ हजार ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातील टीबीची राजधानी म्हणूनच जणू मुंबईची ओळख बनली आहे. एमडीआर टीबीवरील उपचारपद्धती ही जास्त दिवस चालणारी आहे. त्यामुळे अनेक रुग्ण यामुळे उपचार सोडतात. तर जास्त दिवस उपचार घ्यावे लागत असल्याने त्याचे दुष्परिणाम देखील दिसतात. टीबी आणि एचआयव्ही औषध जास्त काळ असल्याने टीबी आणि एड्स विषाणू औषधांना प्रतिसाद देत नाहीत. तसेच ते स्वतः बदल करून घेतात. त्यामुळे संक्रमणांवर उपचार करणे अधिक कठीण होते. उपचार जास्त दिवस होत असल्याने उपचाराचा खर्च वाढतो. औषधे लागू होत नसल्याने आजार गंभीर स्वरूप प्राप्त करतो त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.
जगातील सर्व देशांनी २०३० पर्यंत एड्स आणि टीबी संपवण्याची तयारी दर्शवली. हे ध्येय गाठण्यासाठी फक्त ११० महिने बाकी आहेत. तर २०२५ पर्यंत टीबी संपवण्यासाठी उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोविड नंतर पुन्हा जनजागृती आणि रुग्णांना औषधे घेण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी उपचार पद्धतीचा अवधी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी खासगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणेने एकत्रित काम करण्याची गरज आहे.
टीबी म्हणजेच क्षयरोगामुळे जगभरात दरवर्षी लाखो नागरिकांचा मृत्यू होतो. भारतातही टीबीच्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे, हा एक अत्यंत संसर्गजन्य जीवाणूजन्य रोग आहे, जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. शरीराच्या इतर अनेक भागांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस बॅक्टेरियामुळे होतो. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा क्षयरोग निर्माण करणारे जीवाणू पसरतात.
आता कोरोनाशी टीबीचा संबंध असण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे, मात्र याची पुष्टी झालेली नाही. कोविड संसर्गानंतर कमकुवत झालेल्या फुफ्फुसांवर टीबी अटॅक करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत लक्षणे दिसताच क्षयरोगाची तात्काळ चाचणी करून घ्या आणि गंभीर होण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये त्यामुळे इतरांनाही संसर्ग होतो. टीबीच्या जीवाणूंचा संसर्ग झाल्यानंतर काही आठवडे किंवा वर्षांनी हे घडू शकते.
क्षयरोगास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाने संक्रमित बहुतेक लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा त्यात सामान्यतः खोकला तसेच कधीकधी खोकल्यातून रक्त येणे, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, ताप यांचा समावेश होतो. कोरोना महामारी आणि श्वसनाच्या लक्षणांसाठी आरोग्य सेवा केंद्रांशी संपर्क साधणाऱ्या नागारीकांच्या संख्येत आता घट झाली आहे.
आपल्या राज्यात आतापर्यंत ८१,०६,२७२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये संक्रमितांपैकी १,४८,२६९ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. फुफ्फुसावर परिणाम झाल्यामुळे ही समस्या आली आहे. अशा स्थितीत फुफ्फुसात संसर्ग होण्याचा धोका असतो. फुफ्फुसे कमकुवत झाल्यामुळे कोरोनाच्या काळात टीबीचे रुग्ण वाढल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आरोग्य विभाग सध्या टीबी बाधितांचा शोध घेत आहे. कोरोनाच्या काळात अधिक सतर्क राहण्याचा, मास्क लावण्याचा, नियम पाळण्याचा सल्ला हा वारंवार प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
क्षयरोग कोणालाही होऊ शकतो. आशिया, आफ्रिका, रशिया, लॅटिन अमेरिका, पूर्व युरोप यासारख्या भागांमध्ये प्रवास करणे किंवा राहणे यामुळे टीबीची बाधा होऊ शकते. जगातील या भागांमध्ये टीबीचे जास्त रुग्ण आढळतात. जास्त मद्यपान करणे, तंबाखूचे सेवन करणे, ज्यांना हा आजार आहे त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवणे, आरोग्य सेवेत काम करणाऱ्या नागरिकांना धोका असतो.रुग्णाला जी काही औषधे दिली गेली आहेत, ती दररोज योग्य वेळी घ्यावी. औषधं अर्धवट बंद केल्याने टीबीच्या जीवाणूंमध्ये उत्परिवर्तन होऊ शकते.
After Covid This Serious Disease Risk Health