नवी दिल्ली – कोरोनाला २०२० मध्ये महामारी घोषित केल्यानंतर त्यादरम्यान रुग्णांची वास घेण्याची आणि चवीची क्षमता प्रभावित होत होती. या त्रासाच्या मूळापर्यंत जाण्यासाठी शास्त्रज्ञांच्या एका पथकाने २०२० ते मार्च २०२१ पर्यंत एकूण ९७ रुग्णांवर संशोधन पूर्ण केले. फांसच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ऑफ स्ट्रॅासबर्गच्या एका समितीनेही या संशोधनाला मान्यता दिली आहे. या संशोधनात नेमके काय आढळले ते पाहूया.
– ९७ रुग्णांवर संशोधन, आरटीपीसीआरद्वारे कोरोनाचा दुजोरा
– ७ दिवस सरासरी रुग्णांना ओल्फॅक्ट्री डिसऑर्डरशी संबंधित त्रास
– १७ रुग्णांचा चार महिन्यांपर्यंत डॉक्टरांनी फॉलोअप ठेवला
– ६ रुग्णांची वास आणि चवीची क्षमता बर्याच प्रमाणात पुन्हा आली
– ७ रुग्णांमध्ये मर्यादित सुधारणा पाहण्यात आली, ४ रुग्णांमध्ये सुधारणा नाही
कोणाला कोणता त्रास
३८.८ वर्षांच्या वयाच्या ९७ पैकी ६७ महिलांना सात दिवसांपेक्षा अधिक दिवस चवीच्या क्षमतेचा गंभीर त्रास
५१ रुग्णांना ओलफॅक्ट्रीची तपासणी झाली. ४६ रुग्णांची ४ महिन्यांनंतर दुसर्यांदा सविस्तर तपासणी करण्यात आली आणि परिस्थितीचे आकलन करण्यात आले.
५१ पैकी २३ रुग्ण चार महिन्यांनंतर पूर्णपणे बरे झाले. त्यांची चव आणि वास घेण्याची क्षमता सामान्य दिसली.
२७ रुग्ण (५२.९ टक्के) रुग्णांची खूपच किरकोळ सुधारणा दिसली. एका रुग्णात कोणतीच सुधारणा दिसली नाही.
८ रुग्णांना १५.७ टक्के रुग्णांना जवळपास आठ महिन्यापर्यंत वास घेण्याची तक्रार होती. सहा रुग्णांमध्ये थोडी सुधारणा
आठ महिन्यांत दोघांना त्रास
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, संसर्ग झाल्याच्या आठ महिन्यांनंतर ५१ पैकी ४९ (९६.१ टक्के) रुग्ण पूर्णपणे बरे झाले.
एका रुग्णामध्ये एक वर्षाहून अधिक काळापर्यंत वास आणि चवीची क्षमता प्रभावित झाल्याचे दिसून आले. त्याला हायपोस्मिया असे म्हणतात.
एका रुग्णात पारोस्मियाची ओळख पटली. तो मानसिक आरोग्याशी संबंधित त्रास आहे. त्यामध्ये संबंधित व्यक्तीला वास घेण्याची क्षमता क्षीण होते.