विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होत नाही, तोच आता वेगवेगळे आजार वाढू लागले आहेत. सध्या काळी बुरशीचा त्रास आटोक्यात येत नाही, तोपर्यंत आता डायबीटीस आणि किडनी (म्हणजेच मधुमेह आणि मूत्रपिंड) या आजारांचा त्रास अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे. याबाबत काळजी घेण्याचे आव्हान तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर या संसर्गतून मुक्त झालेल्या लोकांमध्ये मधुमेहाचा त्रास आणि मूत्रपिंडात जळजळ होण्याची समस्या वाढत आहे. मधुमेह प्रादुर्भाव जवळजवळ एक तृतीयांश म्हणजेच पूर्वी कोरोनामध्ये संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये ३० ते ३५ टक्के वाढला आहे. एवढेच नव्हे तर सुमारे १५ टक्के लोकांमध्ये मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाचे विकार वाढले आहेत.
१) एंडोक्रिनोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. वेद प्रकाश म्हणाले की, कोरोनामुळे, गेल्या दोन महिन्यांत नवीन मधुमेहच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. कोरोना संक्रमणामुळे मधुमेह रूग्णांच्या तीन नवीन श्रेणी तयार झाल्या आहेत. एक म्हणजे ज्यांना आधीच शुगर होती, त्यांच्यात अनियंत्रित शुगरची तक्रार खूप वाढली आहे. त्याशिवाय आणखी एक नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे रुग्णालयात रूग्ण भरती दरम्यान औषधे दिली जात होती, त्याच्या परिणामामुळे कोरोना बरा झाल्यावरही शुगर नियंत्रण करता आले नाही. त्याचबरोबर त्वरित शुगर वाढीचेही रुग्ण तिसऱ्या प्रकारात दाखल झाले होते, या वर्गाची शुगर वाढली पण काही दिवसात तेही बरे झाले.
२) डॉ. अमित कुमार यांनी सांगितले की, कोणत्याही संसर्ग झाल्यास शरीरात ग्लूकोजचे प्रमाण वाढते. कोरोनाचा संसर्ग हा रुग्णांच्या शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करीत आहे. त्यामुळे बरे झाल्या त्यानंतरही ती व्यक्ती तणावातून जगत आहेत. ताणतणाव, झोपेचा अभाव आणि विश्रांती ही शुगर वाढण्याचे एक प्रमुख कारण बनले आहे.
३) ज्येष्ठ मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. पंकज हंस म्हणाले की, अलिकडच्या काळात मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाच्या विकारांनी ग्रस्त नवीन रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यांची संख्या १५ वरून २० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत संसर्ग झालेल्या रूग्णाचा यात समावेश आहे. या रुग्णांची मूत्रपिंड क्षमता कमी असल्याचे आढळले आहे. तसेच मूत्रात यूरिया, प्रथिने आणि क्रिएटीनचे प्रमाण वाढत आहे. कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांना त्यांची शुगर आणि मूत्रपिंड विकार हा आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
४) प्रतिबंधात्मक उपाय
मधुमेह आणि किडनीची समस्या टाळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर म्हणाले की, कोरोनाचा सौम्य संसर्ग असलेल्या रूग्ण वगळता इतर सर्व प्रकारच्या संक्रमित रुग्णांना बरे झाल्यानंतर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच
– शुगर ताबडतोब चेक करा.
– आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा.
– तणाव टाळा, भरपूर झोप, विश्रांती घ्या.
– योग आणि रोजचा व्यायाम करा.
– योग्य प्रमाणात पाणी प्या.
– तसेच काही समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.