विशेष प्रतिनिधी, पुणे
कोरोना काळात मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या वारसांना आर्थिक लाभ मिळावा म्हणून केंद्र सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे एखाद्याचे बँकेत खाते असेल, आणि ३३० रुपये कपात झाल्यास कोरोनाने मृत्यू झालेल्या त्या व्यक्तीच्या वारसांना २ लाख रुपये मिळू शकतात, अशी ही योजना आहे.
विमा कंपन्यांबरोबर बँका खातेधारकांना आर्थिक संरक्षण पुरविण्यात येत आहे. त्यामुळे कोविड १९च्या महामारीत कुटुंबांना आर्थिक मदत होऊ शकते. वस्तुतः मोदी सरकारने पीएमजेजेबीवाय म्हणजे कमी प्रीमियमची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही विमा योजना सुरू केली आहे. यात बँकेत बचत खाते असेल तरच आपण या विम्याचा लाभ घेऊ शकता.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रत्येक भारतीयांसाठी असून यात १८ ते ५० वर्षे वयोगटातील प्रौढांचा समावेश असू शकतो. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही इतर जीवन विमा प्रमाणेच आहे. नोंदणीसाठी बँक आणि जीवन विमा कंपन्यांमध्ये करार झाला आहे. त्यामुळे आपल्याकडे बँक खाते नसल्यास ते उघडावे, तसेच वृद्ध ग्राहक बँकेत विचारून या विम्याचा लाभ घेऊ शकतात.
आपल्या खात्यातून ३३० रुपये वजा केल्यास तोच वार्षिक प्रीमियम असून २ लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे. परंतु दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. तसेच आपणास हा विमा चालू ठेवावा की नाही? हे विमा नूतनीकरणापूर्वी बँक दरवर्षी स्मरणपत्र पाठवते. विम्याची मुदत १ जून ते ३१ मे दरम्यान आहे. दर वर्षी मे महिन्यात ३३० रुपये प्रीमियम भरावा लागतो. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत लाइफ कव्हर उपलब्ध आहे.