विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना साथीच्या काळात मृत्यू झालेल्या कर्मचारी आणि नागरिकांच्या कुटुंबांना सरकारकडून मदत करण्यात येत आहे. तसेच अन्य उद्योग-व्यवसायाकडूनही आपल्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात देण्यात यावे देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीनेही कोरोना संसर्गामुळे जीव गमावलेल्या आपल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजनेही घोषणा केली आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटूंबाला पुढील ५ वर्षे पगार मिळणार आहे. हा पगार कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगाराइतका असेल. याशिवाय मुलांना पदवीपर्यंत शिक्षण घेण्यास मदत करण्यात येईल.
याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशन यांनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘रिलायन्स फॅमिली सपोर्ट अँड वेलफेयर स्कीम’ अंतर्गत भारतातील कोणत्याही संस्थेत पदवीपर्यंतचे शिक्षण शुल्क, वसतिगृह राहण्याची व्यवस्था आणि कर्मचार्यांच्या सर्व मुलांची पुस्तके संपूर्ण खर्चात समाविष्ट केली जातील. मृत कर्मचार्याच्या जोडीदारास, पालकांना आणि मुलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी विमा प्रीमियमच्या १०० टक्के रक्कम देखील देईल.









