इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनासारख्या गंभीर आरोग्य आपत्तीतून जग सावरत असतानाच आता नव्या विषाणूने धडक दिली आहे. या नव्या विषाणूचे नाव खस्ता २ असे आहे. हा विषाणू कोरोनापेक्षाही खतरनाक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. प्राण्यांपासूनच या विषाणूच्या संसर्गाचा मानवाला धोका असल्याचेही संशोधनातून समोर आले आहे.
गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत जगभरात कोरोना व्हायरस हाहाकार माजवला होता. त्यामुळे कोट्यावधी नागरिक रुग्णालयात दाखल झाले होते, तर लाखो रुग्ण दगावले होते. तेव्हा वटवाघूळ हाच कोरोना व्हायरसचा मूळ स्रोत असल्याचे मानले जात होते. चीनच्या वुहान शहरातल्या प्राण्यांच्या बाजारातून हा विषाणू माणसांमध्ये शिरला आणि नंतर जगभरात पसरला, असा दावा केला गेला होता. पुन्हा त्यानंतर एका संशोधनातून कोरोना काळातच शास्त्रज्ञांना आणखी एका विषाणूची माहिती मिळाली असून कोरोनाप्रमाणेच वटवाघुळ, पॅगोलिन, कुत्रे आणि डुक्कर या सारख्याप्राण्यांमध्ये आढळतो. खोस्ता २ असे या विषाणूला नाव देण्यात आले आहे.
प्राण्यांपासून धोका :
महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना २०२० मध्ये रशियन वटवाघळांमध्ये हा विषाणू पहिल्यांदा सापडला. या टीमने दोन नवीन विषाणू शोधले असून त्यांना खोस्ता १ आणि खोस्ता २ अशी नावे दिली आहेत. त्याच्या शोधात खोस्ता १ हा मानवांसाठी जास्त धोकादायक नसल्याचे आढळून आले आहे. पण खोस्ता २ मध्ये काही त्रासदायक लक्षणे दिसून आली आहेत. तो प्राण्यांमधून मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो.
शरीरातील पेशींवर हल्ला
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनावरील संशोधनादरम्यान, खोस्ताबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली होती. परंतु त्यावेळी वैज्ञानिकांनी या विषाणूला गांभीर्याने घेतले नाही, कारण त्यात अशी कोणतीही लक्षणे आढळून आलेली नव्हती. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र वर्षा गणिक नवनवे रोग समोर येत आहेत व ते महामारीचे रूप घेता आहेत. या सर्वामुळे अधिक साथीचे आजार पुढेही येत राहतील, त्यापैकी, खोस्ता 2 हा व्हायरस एक वेगळा प्रकार आहे, तो मानवी पेशींवर हल्ला करण्यास सक्षम आहे. तसेच हा विषाणू सब कोव्हायरस नावाच्या कोरोना व्हायरसच्या उप-श्रेणीचा आहे.
सार्वत्रिक लसीची गरज :
काही संशोधकांचे म्हणणे आहे की, आगामी काळात कोविडसारख्या साथीच्या रोगांपासून मानवांचे संरक्षण करण्यासाठी सरबेको व्हायरस विरूद्ध सार्वत्रिक लस विकसित करण्याची गरज आहे. सरबे कोव्हायरस हा एक श्वसनाशी निगडीत विषाणू आहे, याचे कॉम्बिनेशन ही विषाणूजन्य स्ट्रेनची नवीन स्ट्रेन तयार करण्याची प्रक्रिया आहे. दरम्यान, खोस्ता-२ आणि कोरोनाहे एकाच वर्गातील विषाणू आहेत, असे समजते.
कोरोना लस निष्प्रभ :
गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळापासून जगाला कोरोना व्हायरस ने विळखा घातला आहे. कोरोनामुळं अनेकांनी आपले जीव गमावले. सध्या कोरोना प्रादुर्भावात घट झाली असली तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. कोरोनाप्रमाणेच खोस्ताही शरीरातील पेशींवर हल्ला करतो. तसेच, सध्या कोरोना प्रतिबंधक लस म्हणून दिल्या जाणाऱ्या लसी खोस्ता व्हायरसच्या संसर्ग क्षमतेवर व प्राणघातक हल्ल्यावर प्रभावी नसल्याचेही संशोधनातून समोर आले आहे.
नमुन्यात आढळला :
कोरोनाचा उद्रेक २०१९ मध्ये चीनमध्ये झाला आणि २०२० च्या सुरुवातीच्या महिन्यापर्यंत संपूर्ण जगाचा ताबा घेतला. सोची राष्ट्रीय उद्यानाजवळ मार्च-ऑक्टोबर २०२० दरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये या व्हायरसची ओळख पटली. हा तो काळ होता जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा सामना करत होते.
संसर्गाचा धोका :
प्राण्यांमधून माणसात एखादा आजार येणे, यात नवीन काहीच नाही. नीट अभ्यास केल्यास लक्षात येईल की, नवीन संसर्गजन्य आजार किंवा रोग हे वन्यप्राण्यांमधूनच माणसात आले आहेत. तसेच संशोधकांना खोस्ता २ नावाचा नवा विषाणू हा SARS-CoV-2 विषाणू सारखाच आहे. प्राथमिक संशोधनाच्या आधारे, शास्त्रज्ञांना असे आढळले की, हा व्हायरस मानवी पेशींमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतो आणि संसर्गाचा धोका वाढवू शकतो.
संशोधन सुरू :
खोस्ता-१ विषाणूची लागण मानवाला झाल्याचे एकही प्रकरण आतापर्यंत नोंदवण्यात आलेले नाही. पण नव्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, खोस्ता २ विषाणू मानवांनाही संक्रमित करू शकतो. तसेच या विषाणूला रोखण्यासाठी कोरोनाची कोणतीही लस प्रभावी नाही. दरम्यान, खोस्ता २ विषाणूपासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आधीच लस तयार करण्यास सुरुवात केली आहे. ती लस आता SARS-CoV-2 वर्गातील आणि यांसारख्या सर्व विषाणूसपासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरु शकेल.
After Corona Khosta 2 Virus Alert Humans