नवी दिल्ली – सुमारे दोन वर्षांपूर्वी चीन मधून आलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले होते. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉनने सर्व जगाला पुन्हा एकदा चिंतेत टाकले आहे. विशेषतः युरोपातील देशांमध्ये या नव्या प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना आता भारतात देखील त्याचे रुग्ण आढळून येत असल्याने सरकारसह सर्वसामान्य जनतेमध्ये देखील काळजी निर्माण झाली आहे.
ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी लसीचा बूस्टर डोस हा महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे, परंतु दिल्लीमध्ये तिसरा डोस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाल्याचे प्रकरण आहेत. अशा रूग्णांच्या नमुन्यांच्या जीनोम अनुक्रमात देखील ओमिक्रॉन संसर्गाची माहिती समोर आली आहे. हे तीन रुग्ण सध्या लोकनायक रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. गेल्या एकत्र आढळलेल्या 12 रुग्णांमध्ये या 3 जणांही समावेश होता.
गेल्या आठवड्यात या तीन रुग्णांमध्ये ओमिक्राँनचा संसर्ग आढळून आला आहे. सध्या हे सर्वजण ओमिक्रॉन वॉर्डमध्ये दाखल आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही संसर्गाची लक्षणे दिसत नाहीत. अशी माहिती देताना रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर म्हणाले की, देशात अद्याप बूस्टर डोसला मान्यता मिळालेली नाही. मात्र हे प्रवासी नुकतेच परदेश दौऱ्यावर गेले होते आणि तेथे त्यांनी लशीचा अतिरिक्त डोस घेतला. दिल्लीत आल्यानंतर विमानतळावरील स्क्रिनिंगमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यावर त्याला येथे दाखल करण्यात आले.
ओमिक्रॉनची प्रकरणे वाढल्यानंतर, अनेक देशांनी बूस्टर डोस मंजूर केले आहेत. जर्मनीसारख्या देशात आता लहान मुलांनाही संसर्गापासून वाचवण्यासाठी लसीकरण केले जात आहे. भारत सरकारने देखील अद्याप या लसीच्या बूस्टर डोसला ग्रीन सिग्नल दिलेला नाही. अलीकडेच, निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी सांगितले होते की, सर्वप्रथम भारतातील सर्व नागरिकांना पूर्णपणे लसीकरण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. तसेच रुग्णालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे, मात्र संसर्गाचा धोका कुणामध्ये दिसला नाही. 22 पैकी फक्त दोन रुग्णांमध्ये आतापर्यंत लक्षणे दिसून आली आहेत आणि यापैकी एका रुग्णाने दोन्ही डोस घेतल्यानंतर बुस्टर लशीकरण पूर्ण केले आहे.