नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साधारणतः आपण कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा किराणामध्ये समाविष्ट असलेल्या वस्तूंवर ‘बाय वन गेट वन फ्री’ अशी ऑफर पाहतो, परंतु दिल्लीमध्ये मद्य विक्रेत्यांनी चक्क या ऑफरचा वापर करीत मद्य शौकिनांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. दिल्ली मधील अनेक मद्य विक्रेत्यांनी ‘बाय वन गेट वन फ्री बॉटल ‘ इतकेच नव्हे तर ‘बाय वन गेट वन फ्री बॉक्स ‘ अशी ऑफर दिल्याने मध्ये शौकीनांची चांगलीच मजा होत आहे. त्यामुळे मद्यविक्रीच्या दुकानांसमोर रात्रंदिवस रांगा दिसत असून आता तर दिल्ली परिसरातील हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यांमधील मद्यप्रेमी देखील राजधानी दिल्लीच्या दिशेने धाव घेताना दिसून येतात, कारण असे म्हटले जाते की, ‘पीनेवाले को तो बस पीने का बहाना चाहिये’
दिल्लीतील दारू पिण्याचे शौकीन असालेल्यांसाठी दारूच्या दुकानांवर ‘फ्री ऑन बाय बॉटल’ आणि ‘फ्री ऑन बाय वन बॉक्स’ ही ऑफर बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. ती मार्चअखेरपर्यंत टिकणे अपेक्षित आहे, पण स्वस्त दारूची ही किफायतशीर ऑफर किती दिवस टिकणार? त्याचा निर्णय मद्यसाठ्यावर होणार आहे. दारूच्या दुकानातील साठा संपताच ही ऑफर संपेल. सध्या मात्र या ऑफरचा बहुतांश मद्य प्रेमी फायदा घेताना दिसतात. दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत दारूच्या किमतीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अशा स्थितीत कंत्राटदारांना यापेक्षा कमी दराने दारू विकावी लागते, ते जास्त दराने विकू शकत नाहीत. अशा स्थितीत दुकानांमध्ये कमीत कमी किमतीत म्हणजे अनेक आकर्षक ऑफर्ससह दारूची विक्री होत आहे. त्याच वेळी, दिल्लीतील दारूच्या दुकानांवर जारी करण्यात आलेल्या या मोहक ऑफरचा फायदा घेणारे दिल्लीच नाही तर उत्तर प्रदेश आणि हरियाणातील नागरिक देखील आहेत.
प्रत्यक्षात दारूबरोबरच बिअरही 30 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. 125 रुपये असलेली बिअर आता 95 रुपये झाली आहे. तसेच पूर्वी जी बिअर 150 बाटली होती, ती आता 130 झाली आहे. दिल्लीत जवळपास 60 ब्रँड्सचे बिअर आहेत, त्याचप्रमाणे मद्याचा लोकप्रिय ब्रँड असलेल्या टीचर्सवर 120 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर ब्रँडची दारू पाच ते सात टक्क्यांनी महागली आहे.
सध्या दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणामुळे अनेक दारूच्या दुकानांवर एका बाटलीच्या खरेदीवर दुसरी बाटली मोफत, तर काही ठिकाणी एका बॉक्सच्या खरेदीवर दुसरी बाटली मोफत मिळत आहे. दिल्ली सरकारच्या नवीन धोरणानुसार, शहरात एकूण 849 दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दारू स्वस्त करण्यामागील कारण म्हणजे मार्चअखेर दारू दुकानांना त्यांचा साठा संपवावा लागणार आहे, कारण नवीन आर्थिक वर्षात परवान्याचे नूतनीकरण होणार आहे.दिल्लीतील दारू दुकानांच्या नवीन आर्थिक वर्षात परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी दुकानदार त्यांच्या स्टॉकवर मोठ्या प्रमाणात सूट आणि अतिशय आकर्षक ऑफर देत आहेत. दिल्लीतील अनेक भागातील दारूच्या दुकानांनी काही ब्रँडवर 35 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे.