नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. आता अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याचा मुद्दा पुढे आला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री केसरकर बोलत होते. मंत्री श्री केसरकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर नामांतरसाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव, माहिती पाठविण्यास कळविले आहे. शिवाय अहमदनगर महापालिका, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पोस्ट कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कळविण्यात आले आहे. सर्व परिपूर्ण माहिती आल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रा. राम शिंदे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.
#विधानपरिषद_प्रश्नोत्तरे#अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली. pic.twitter.com/mdvdHWnc6k
— AIR News Pune (@airnews_pune) December 28, 2022
After Aurangabad This City Name Will be Change Soon
Ahmednagar Punyashlok Ahilyadevi Nagar
Maharashtra State Assembly Winter Session Nagpur
Minister Deepak Kesarkar BJP MLC Gopichand Padalkar