मुंबई – देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या एअरटेलने प्रीपेड प्लॅनच्या किंमती 25 टक्क्यांपर्यंत वाढवून ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. त्यातच आता प्रतिस्पर्धी कंपनी Vodafone-Idea (Vi) नेही आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. व्हीआय (Vi) कंपनीने रिचार्ज प्लॅनची नवीन दर यादी जारी केली आहे. त्यानुसार 25 नोव्हेंबरपासून Vi रिचार्ज प्लानच्या नवीन किंमती देशभरात लागू होतील. तर Airtel प्लॅनच्या नवीन किंमती 26 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
सर्वात स्वस्त रिचार्ज
Vodafone-Idea च्या 79 रुपयांच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत आता 99 रुपये असेल. याचा अर्थ Vi चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन 99 रुपयांचा असेल. या नव्या प्लॅनमध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200MB डेटा मिळेल.
अमर्यादित व्हॉइस प्लॅनसाठी, Vi वापरकर्त्यांना 149 रुपयांऐवजी 179 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येईल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 300SMS आणि 2GB डेटा मिळेल.
दैनंदिन 2GB प्लॅनसाठी, वापरकर्त्यांना 269 रुपयांचे किमान रिचार्ज करावे लागेल, आधी ते 219 रुपयांमध्ये उपलब्ध होते. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल. या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा व्यतिरिक्त, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS उपलब्ध असतील. त्याच वेळी, दररोज 1.5 डेटासाठी, 299 रुपयांचे किमान रिचार्ज करावे लागेल. तर दैनंदिन 2 जीबी डेटाचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन 359 रुपयांमध्ये येईल.
Vi चा सर्वात महागडा व्हॉईस प्लान 2399 रुपयांऐवजी 2899 रुपयांना मिळेल. या योजनेत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग तसेच दररोज 100 एसएमएस आणि दररोज 1.5 GB डेटा प्लॅनसह येईल. तसेच Vi चा सर्वात स्वस्त डेटा प्लॅन 28 रुपयांऐवजी 58 रुपयांमध्ये येईल. या प्लानमध्ये 28 दिवसांसाठी 3GB डेटा मिळेल. तर सर्वात महागडा डेटा प्लान 351 ऐवजी 418 रुपयांमध्ये येईल. या प्लॅनमध्ये 100 GB कमाल डेटा मिळेल. त्याची वैधता 56 दिवसांची असेल.