इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एअर इंडियानंतर आता आणखी एक सरकारी कंपनी टाटांच्या ताफ्यामध्ये आली आहे. या कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. ओडिशा येथील नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीला टाटा समूहाच्या कंपनीकडे सोपवण्याचे काम जुलैच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Tata Steel Long Products (TSLP), टाटा स्टीलच्या युनिटने या वर्षी जानेवारीमध्ये NINL मधील 12,100 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्याने 93.71 टक्के भागभांडवल विकत घेण्याची बोली जिंकली होती. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, नलवा स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड यांना मागे टाकून कंपनीने हे यश मिळविले आहे.
“व्यवहार अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत हस्तांतरण झाले पाहिजे,” असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. कंपनीमध्ये सरकारची कोणतीही भागीदारी नसल्यामुळे, विक्रीची रक्कम सरकारी तिजोरीत जमा होणार नाही. आणि त्याऐवजी ओडिशा सरकारच्या चार CPSE आणि दोन PSU मध्ये जाईल.
नीलाचल इस्पात निगम लिमिटेडचा कलिंगनगर, ओडिशा येथे 1.1 मेट्रिक टन क्षमतेचा एकात्मिक स्टील प्लांट आहे. ही सरकारी कंपनीही मोठ्या तोट्यात चालली असून ३० मार्च २०२० पासून हा प्लांट बंद आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत कंपनीवर ६,६०० कोटी रुपयांची कर्जे आणि दायित्वे आहेत. ज्यात प्रवर्तकांचे ४,११६ कोटी रुपये, बँकांचे १,७४१ कोटी रुपये, इतर कर्जदार आणि कर्मचाऱ्यांची मोठी देणी यांचा समावेश आहे. आता टाटा या कंपनीला कशा पद्धतीने फायद्यात आणते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
after air india this government psu also in tata group