विशेष प्रतिनिधी, मुंबई
सीरम इन्सिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला गेल्या काही दिवसांपासून त्यांचा मुलगा आदर पुनावाला यांच्याकडे लंडनला मुक्कामी आहेत. पण देश सोडल्याच्या आरोपांचे त्यांची खंडन केले आहे. लंडन येथील एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणतात की, उन्हाळ्याच्या सुट्यांसाठी मी लंडनला आलो आहे. दरवर्षी मे महिन्यात मी इथे येत असतो. संकटाच्या काळात माझ्यावर किंवा माझ्या मुलावर देश सोडण्याचा आरोप होणे दुर्दैवी आहे.
सायरस पुनावाला यांना व्हॅक्सीन किंग म्हणून ओळखले जाते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी आतापर्यंत ९० टक्के कोविड लशींची पूर्तता भारतात केली आहे. ते सुद्धा एक महिन्यापासून लंडनमध्ये आहेत. पुनावाला म्हणाले की, मला आठवतं मी दरवर्षा मे महिन्यात भारताच्या बाहेरच राहिलो आहे. प्रत्येकाला उन्हाळ्यात सुट्या हव्या असतात आणि त्यात काहीच नवे नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
