इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही बँकेत पैसे ठेवले की, त्याचे व्याज मिळते. सहाजिकच भारतात असो की अन्य देशात सर्वसामान्य ग्राहक बँकेत पैसे ठेवतात. परंतु चिली या देशात बँकेत पैसे ठेवण्याच्या कारणावरून एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. कारण एका ग्राहकाचे सुमारे साठ वर्षानंतर पासबुक मिळाले असून सदर ग्राहक मृत्यू पावल्यानंतर आता त्याचे कुटुंब त्या बँकेकडे व्याजासह पैशाची मागणी करत आहेत त्यामुळे आता नेमके काय करावे असा चिली सरकारकडे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
चिलीतील एका जुन्या बँक स्टेटमेंटमुळे सरकारला अडचणीत आणले आहे. एक्सक्विल हिनोजोसा नावाच्या माणसाला त्याच्या वडिलांच्या जुन्या बॉक्समध्ये 1960-70 चे जुने पासबुक सापडले, ज्यामध्ये त्याच्या वडिलांच्या खात्यात 140,000 पेसो असल्याचे सांगितले होते. वर्षानुवर्षे हे पासबुक पेटीतच बंद पडले होते. अलीकडे, जेव्हा एक्सक्विलने बॉक्स उघडला, तेव्हा त्याला एक पासबुक सापडले ज्यामध्ये त्याच्या वडिलांच्या खात्यात 1970-80 च्या दशकात 140,000 पेसो (अंदाजे US$163 डॉलर्स ) असल्याचे नमूद केले होते. आजपर्यंत, व्याजासह ही रक्कम 1 अब्ज पेसो ($1.2 दशलक्ष डॉलर्स ) पेक्षा जास्त आहे.
या पासबुकच्या आधारे एक्सक्विल हिनोजोसा आता बँकेकडून वडिलांची ठेव मागत आहे. एक्क्विल हिनोजोसाच्या मागणीमुळे राज्य आणि हिनोजोसा यांच्यातील कायदेशीर लढाई वाढून चिलीच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. सर्व कनिष्ठ न्यायालयांनी एक्क्विल हिनोजोसाच्या बाजूने निर्णय दिला आहे, परंतु राज्य सरकारने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध देशातील सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.
हिनोजोसा सांगतात की, सदर पैसा हा त्याच्या कुटुंबाचा आहे, जो त्याच्या वडिलांनी कष्टाने कमावला होता. ऍक्सक्विल हिनोजोसा यांच्या मते, त्यांच्या वडिलांचे पासबुक अस्तित्वात असल्याचे त्यांच्या कुटुंबाला माहीत नव्हते. वडिलांनी जमा केलेले पैसे मागत असल्याचेही ऍक्क्विल हिनोजोसा यांनी सांगितले. वडिलांची डिपॉझिट मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात संघर्ष करावा लागेल हे त्यांना फारसे माहीत नव्हते. एक्क्विल हिनोजोसा विरुद्ध राज्य सरकारचा निर्णय आता चिलीच्या सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे. एक्क्विल हिनोजोसा म्हणतो की तो त्याच्या वडिलांनी ठेवलेल्या पैशातील प्रत्येक पैसा वसूल करून घेईल.