विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करूनही सत्ताधारी भाजपला लगेचच राज्यसभेच्या जागा वाढविण्यात कोणतीही मदत होणार नाही, कारण अलीकडच्या काळात राज्यसभेत कोणतीही जागा रिक्त नाही. राज्यसभेतील भाजपची एक जागा पुढच्या वर्षीच वाढवून ९६ वर जाईल.
सध्या राज्यसभे या वरिष्ठ सभागृहात भाजपची एकूण सदस्य संख्या केवळ ९५ आहे. तथापि, पुढच्या वर्षी २०२२ मध्ये ७८ खासदारांची मुदत संपुष्टात येत आहे. यात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, पियुष गोयल, मुख्तार अब्बास नकवी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल या प्रमुख नेत्यांचा समावेश आहेत.
ब्रोकरेज कोटक इन्स्टिट्यूट इक्विटीजच्या इंडिया अहवालानुसार २०२२ च्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. कारण उत्तर प्रदेशात त्यांची वाढ असूनही आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधील जागा ते गमावतील. या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपाला शंभरीपार करता आली नाही.
कोविडच्या दुसर्या लाटेत झालेल्या निवडणूकीत सत्ताधारी पक्षांनी चारपैकी तीन राज्यांमध्ये विरोधकांचा पराभव केला आहे. तृणमूलने दोन तृतियांश बहुमताने सत्ता टिकवून ठेवली आहे. तमिळनाडूमध्ये द्रमुक व कॉंग्रेस आघाडीने एआयएडीएमकेच्या भाजपा आघाडीला पराभूत केले. केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफने आपल्या जागा सहज जिंकल्या. त्याचवेळी आसाममध्ये विजय मिळवून भाजपनेही सत्ता मिळविली. म्हणूनच, २०२२ मध्ये राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपाने केवळ एका जागेवर पोहोचणे अपेक्षित आहे.
याशिवाय भाजपचा मजबूत बालेकिल्ला मानल्या जाणार्या गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील पुढील विधानसभा निवडणुकांना आता १२ महिने शिल्लक आहेत. २०१९ पासून भाजप अनेक राज्यांमधील निवडणुका हरला आहे. एनडीए सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक पावले उचलली आहेत. भविष्यातही ते योग्य दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहेत. पण कोविडच्या परिस्थितीमुळे केंद्र सरकारच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत आहे.