नवी दिल्ली – देशात दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या ४० दिवसानंतर २ लाखांपेक्षा कमी झाली आहे (१४ एप्रिल २०२१ रोजी दैनंदिन रुग्णांची नोंद १,८४,३७२ होती). गेल्या २४ तासांत १,९६,४२७ नवीन रुग्ण आढळले.
उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या देखील आता २५,८६,७८२ पर्यंत कमी झाली आहे. १० मे २०२१ रोजी उपचाराधीन रुग्णांची संख्या सर्वोच्च पातळीवर होती ती आता कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत १,३३,९३४ ची घट झाली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या आता देशातील एकूण बाधित रुग्णांच्या ९.६० टक्के आहे. सलग १२ व्या दिवशी देशात बरे झालेल्या दैनंदिन रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा अधिक आहे. गेल्या २४ तासांत ३२६,८५० रुग्ण बरे झाले. भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज २,४०,५४,८६१ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ८९.२६ टक्के पर्यंत वाढला आहे.