इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – खासगी असो की शासकीय प्रत्येक क्षेत्रातील कर्मचाऱ्याला आपल्या भविष्याची चिंता असते, साहजिकच प्रशासन विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीची तरतूद करण्यात येते, या संदर्भात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगाराचा मोठा भाग पीएफ म्हणून कापला जातो, तो दरमहा कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा होतो. ईपीएसच्या नियमानुसार आता १० वर्षांच्या नोकरीनंतर सर्वांना पेन्शन मिळणार आहे. एक अट पूर्ण करावी लागणार आहे.
नव्या नियमांनुसार, कर्मचार्यांच्या मूळ पगाराच्या १२ टक्के प्लस डीए दरमहा पीएफ खात्यात जमा केला जातो. यामध्ये कर्मचार्यांचा संपूर्ण हिस्सा EPF मध्ये जातो, तर ८.३३ टक्के नियोक्ता कर्मचारी पेन्शन स्कीम (EPS) मध्ये जातो आणि ३.६७ टक्के दरमहा EPF योगदानात जातो. EPFO च्या नियमांनुसार, १० वर्षे सतत काम केल्यानंतर, कर्मचारी पेन्शनचा हक्कदार बनतो. मात्र यामध्ये एकच अट आहे की नोकरीचा कालावधी १० वर्षांचा असावा. ९ वर्षे ६ महिन्यांची सेवा देखील १० वर्षांच्या बरोबरीची मानली जाते. या कालावधीपासून म्हणजे कामाचा कालावधी साडेनऊ वर्षांपेक्षा कमी असेल तर तो फक्त नऊ वर्षे म्हणून गणला जाईल. त्यामुळे या परिस्थितीत, कर्मचारी निवृत्तीपूर्वीच पेन्शन खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकतो. परंतु त्यानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही.
पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी, ईपीएफओच्या नियमांनुसार, नोकरीतील अंतर विचारात न घेता सेवेचा एकूण कालावधी जोडून १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला जातो. मात्र प्रत्येक कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्याने आपला UAN क्रमांक बदलू नये. म्हणजेच, पेन्शनसाठी १० वर्षांच्या सेवेचा कालावधी केवळ एकच UAN क्रमांकावर असावा. अनेक जण त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे मध्येच नोकरीतून ब्रेक घेतात आणि काही वर्षांनी पुन्हा नोकरी सुरू करतात. त्यांना पेन्शन योजनेचा लाभ कसा मिळणार हे जाणून घेण्याची गरज आहे.
समजा नोकरी बदलल्यानंतरही UAN तसाच राहिला आणि PF खात्यात जमा केलेले संपूर्ण पैसे त्याच UAN मध्ये दिसतील. दोन नोकऱ्यांमध्ये काही काळ अंतर असल्यास ते काढून टाकून कार्यकाळ एक मानला जातो. म्हणजेच, पूर्वीची नोकरी आणि नवीन नोकरी यातील अंतर काढून टाकले जाते आणि ते नवीन नोकरीमध्ये जोडले जाते. त्यामुळे पहिल्या कंपनीत जर तुम्ही पाच वर्षे काम केले असेल आणि दुसऱ्या कंपनीत सहा वर्षे झाली असतील, तर त्याच्या मधील कालावधी काढून टाकला जाईल आणि तो ११ वर्षांचा कालावधी धरला जाईल. अशा प्रकारे कर्मचारी हा रिटायरमेंट नंतर पेन्शनचा लाभ घेण्यास पात्र ठरतो.
After 10 Year Service Get Pension
Employee Pension Scheme EPS Rule