काबुल – अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेच्या १३४ क्षमता असलेल्या विमानात तब्बल ८०० लोकांनी प्रवेश केल्याचा फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. विमानात प्रवेश केलेल्यांपैकी ६४० लोक हे अफगाणी नागरिक आहेत. अमेरिकेच्या वायूदलाचे हे विमान अमेरिकन नागरिकांची सुटका करण्यासाठी काबुलला गेल्यानंतर या विमानात बसण्यासाठी अशी गर्दी झाली. अफगाणिस्तानमध्ये राहिलो तर आपल्याला ठार मारले जाईल ही भीती या नागरिकांमध्ये असल्यामुळे ही गर्दी झाली.. एेवढे लोक घेऊन जाण्यासाठी शेवटी विमानातील सर्व सीट्स काढून टाकले. त्यानंतर सर्व लोकांनी खालीच बसून या विमानात प्रवास केला.
https://twitter.com/DefenseOne/status/1427395255788244992?s=20