नवी दिल्ली – तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर भारताशी होणारा व्यापार रोखला आहे. आता काबुलला कोणतीही वस्तू निर्यात करता येणार नाही, आणि तिथूनही कोणतीही वस्तू आयात होणार नाही. त्यामुळे बाजारात सुका मेव्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय निर्यात संघटना महासंघाचे (एफआयईओ) महासंचालक डॉ. अजय सहाय सांगतात, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. पाकिस्तानच्या ट्रांझिट मार्गाने अफगाणिस्तानहून भारतासाठी आयात केली जाते.
सध्या तालिबानने पाकिस्तानकडे जाणारे सर्व कार्गो थांबविले आहेत. त्यामुळे व्हर्च्युअली आयातही थांबली आहे. काही उत्पादने आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण ट्रान्सपोर्ट कॉरिडोअरच्या माध्यमातून पाठविले जातात. तो व्यापार अजूनही सुरू आहे. दुबईच्या मार्गाने पाठविल्या जाणार्या उत्पादनांचा मार्ग अद्याप बंद झालेला नाही. अफगाणिस्तानात वेगाने परिस्थिती बदलत असल्यानंतरही भारताशी व्यापारी संबंध कायम ठेवण्याची आशा एफआयईओ डीजीने व्यक्त केली आहे.
या वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार
एफआयईओ डीजी सांगतात, भारत सध्या अफगाणिस्तानला साखर, औषधे, कपडे, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवरचा पुरवठा करतो. अफगाणिस्तानातून बहुतांश सुका मेव्याची आयात केली जाते. थोडा कांदा आणि डिंकही आपण आयात करतो.
भारत-अफगाणिस्तान व्यापार
– तीन प्रमुख देशांमध्ये भारत-अफगाणिस्तानच्या व्यापारी भागिदारांपैकी एक आहे.
– दोन्ही देशांदरम्यान ८३.५ कोटींचा द्विपक्षीय व्यापार झाला आहे.
– भारताने अफगाणिस्तानातून ५१ कोटी डॉलरच्या वस्तूंची आयात केली आहे.
– अफगाणिस्तानात भारताने ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
– अफगाणिस्तानात ४०० प्रकल्पांमध्ये भारताने पैसे गुंतविले आहेत. काहींचे काम सुरू आहे.