इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात सुमारे शंभर वर्षांपासून स्त्री पुरुष समानतेचे चळवळ सुरू असून बहुतांश देशांमध्ये स्त्री-पुरुष समान हक्काला मान्यता मिळालेली आहे. परंतु अद्यापही काही देशांमध्ये स्त्रीयांना जणू काही गुलामगिरीची वागणूक देण्यात येत असून त्यांच्यावर अनेक प्रकारची बंधने लादण्यात येतात.
विशेषत : समाजात वावरताना स्त्रियांनी ही बंधने पाळावीत, यासाठी खडक निर्बंध आणि कायदे लागू करण्यात येतात लागू करण्यात येतात सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवटीचे राज्य असून या ठिकाणी या देशात स्त्रियांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानच्या सत्तेमुळे महिलांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा आहे. आधी शाळेत जाणारे विद्यार्थी आणि आता लांबच्या प्रवासाला निघालेल्या महिलांबाबत तालिबानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.
याबाबत अफगाणिस्तानमधील तालिबान अधिकार्यांनी सांगितले की, लांब पल्ल्याचा प्रवास करणार्या महिलांना जवळचा पुरुष नातेवाईक सोबत असल्याशिवाय त्यांना वाहतूक दिली जाऊ नये. शिष्टाचाराशी संबंधित मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, सर्व वाहनधारकांना केवळ हिजाब परिधान केलेल्या महिलांना बसण्याची सूचना देण्यात आली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते सादिक अकीफ मुहाजिर यांनी सांगितले की 45 मैल म्हणजे 72 किमी पेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक नसतील तर त्यांना वाहतूक करू देऊ नये. याशिवाय, सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये त्यांच्या वाहनांमध्ये संगीत वाजवणे थांबवण्यासही सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयाने अफगाणिस्तानमधील दूरचित्रवाणी वाहिन्यांना महिलांचा समावेश असलेल्या कार्यक्रमांचे प्रसारण बंद करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय महिला न्यूज अँकरना स्कार्फ घालण्यास सांगितले होते. तसेच मुहाजिर यांनी सांगितले की, हिजाब हा इस्लामिक निकाब आहे आणि सर्व महिलांना प्रवास करताना तो परिधान करावा लागेल.