नवी दिल्ली – सुप्रसिद्ध अभिनेत्री अंजलिना जॉली हिने अफगाणी मुलीचे शेअर केलेले पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले आहे. अवघ्या २४ तासात हे पत्र लाखो जणांनी वाचले आणि शेअर केले आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू झाल्याने दहशतीचे वातावरण आहे. अफगाणिस्तानात कसे दहशतीचे वातावरण आहे, हे मांडणारे पत्र जॉली हिने शेअर केले. ते वाचून अनेकांना भावना अनावर झाल्या आहेत. हे पत्र शेअर करताना जॉली हिने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमच्या आयुष्यात पुन्हा अंधार झाला असून आम्ही पुन्हा एकदा कैद झालो आहोत, असे त्या मुलीने पत्रात नमूद केले आहे. अंजलिना जॉलिची पोस्ट आणि पत्र असे