मुंबई – प्रत्येकालाच आपले स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न असते. यासाठी प्रत्येक जण त्याकरिता प्रयत्न करत असतो. परंतु नोकरदार वर्ग किंवा छोटे-मोठे व्यवसायिक यांना आजच्या काळात घर घेणे शक्य नसते, कारण घराच्या किमती खूपच वाढलेल्या आहेत. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेऊनच घर खरेदी करावे लागते. मात्र बँकेकडून घेतलेल्या लोनचे हप्ते म्हणजेच ईएमआय भरणे शक्य नसते. त्यामुळे काही वेळा बँकेकडून नोटीस येते आणि घर जप्तीची कारवाई देखील करण्यात येते. अशा प्रकारे अनेक बँकांनी घर जप्ती केली आहे. जप्त केलेल्या या घरांचा काही वेळा लिलाव करण्यात येतो. बँक ऑफ बडोदा देखील या स्वस्त घराचा लिलाव दि ८ डिसेंबरला करणार आहे. आपण व्यावसायिक किंवा निवासी मालमत्ता खरेदी करण्याची तयारी करत असाल, एक विशेष संधी आहे.
लिलाव कधी होणार
बँक ऑफ बडोदाने दिलेल्या माहितीनुसार, मेगा ई-लिलाव दि. ८ डिसेंबर २०२१ रोजी केला जाईल. या अंतर्गत व्यावसायिक किंवा निवासी मालमत्तेचा ई-लिलाव केला जाणार आहे. या संदर्भात बँक ऑफ बडोदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेच्या बाबत ट्विट केले आहे, त्यात म्हटले आहे की, ‘ऑफिसच्या जागेपासून ते अपार्टमेंटपर्यंत, सर्व काही एकाच वेळी एकाच ठिकाणी! तुमचे स्वप्नातील घर आता फक्त एका क्लिकच्या अंतरावर आहे. ‘ अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा- https://bit.ly/3y6R68U
मालमत्ता कशी आहे
बँक डिफॉल्टरच्या मालकीच्या मालमत्तेचा लिलाव करत आहे. कारण असे अनेक ग्राहक आहेत जे वेळेवर कर्जाची परतफेड करू शकत नाहीत. बँका अशा डिफॉल्टरची मालमत्ता जप्त करतात आणि नंतर लिलावाद्वारे थकबाकी वसूल करतात.