नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकाल कधी येणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. यावर प्रश्न विचारला असता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी, ‘सत्ता संघर्षाचा निकाल केव्हा लागेल, याचं भाकीत आज सांगता येणं कठीण आहे.
पण ज्या अर्थी राजकीय घडामोडींना वेग आला आहे त्याअर्थी असा अंदाज काढायला हरकत नाही, की सत्ता संघर्षाचा निकाल नजीकच्या काळात लागेल.’ अशी प्रतिक्रिया दिली..