मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वकीलांचा पोशाख परिधान करून आंदोलन केल्याचा जोरदार फटका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना बसला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बार कौन्सिलने पुढील २ वर्षांसाठी सदावर्तेंची वकिली सनद रद्द करण्याचा निर्णय दिलाय. त्यामुळे सदावर्तेंना आता पुढची २ वर्ष वकिली करता येणार नाहीये.
पेशाने वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ॲड. सुशील मंचेकर यांनी याबाबत महाराष्ट्र बार काउंन्सिलकडे तक्रार केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. यानंतर ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित असल्याचा दावा करत सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. तसेच त्या ड्रेसमध्ये त्यांनी विविध प्रकारची घोषणाबाजीही केली होती.
अशा कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होत असल्याचं म्हणत सदावर्ते यांच्या विरोधात वकील सुशील मणचेकर यांनी शिस्त पालन याचिका तक्रार केली होती. आज याबद्दल बार कौन्सिलच्या तीन सदस्यीय समितीने निकाल देत सदावर्ते यांची दोन वर्षे सनद रद्द केली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांना कोणत्याही कोर्टात वकिली प्रॅक्टिस करता येणार नाही.
काय म्हणाले बार कौन्सिल?
वकिसांसाठी एक आचारसंहिता असते. तिचं उल्लंघन करु नये, अशी अट सनद देताना बार कौन्सिल घालत असते. मात्र याचं अटींचं उल्लंघन केल्याने बार कौन्सिलने सदावर्ते यांच्यावर २ वर्षांसाठी सनद रद्द करण्याची कारवाई केलीये. शिस्तभंगाची कारवाई केली आहे, असे बार कौन्सिलतर्फे सांगण्यात आले आहे.
Advocate Gunratna Sadavarte Hit Bar Council Big Decision