पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य स्तरावरील सर्व जाहिरात वितरण संस्थांची शिखरसंस्था असलेली फेडरेशन ऑफ अॅडव्हर्टायझिंग अॅन्ड मार्केटींग अंत्रप्रन्युअर्स (फेम) च्या अध्यक्षपदी महेश कराडकर (सांगली), उपाध्यक्षपदी प्रफुल्ल मुथा (अहमदनगर), सरचिटणीसपदी संजीव चिपळूणकर (कोल्हापूर) यांची नुकत्याच पुणे येथील हॉटेल तरवडे क्लार्क इनच्या दालनात रविवार, दि. 24 एप्रिल रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2022-2024 या कालावधीसाठी एकमताने निवड करण्यात आली. संपूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या जाहिरात संघटनांच्या पदाधिकार्यांनी एकमताने ही निवड केली.
याचवेळी ‘फेम’च्या विविध पदाधिकार्यांची व कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी खालीलप्रमाणे ः
खजिनदारपदी कौस्तुभ नाबर (कोल्हापूर), सहसचिवपदी महेश अंधेली (सोलापूर) यांची निवड करण्यात आली. तर विभागीय उपाध्यक्षपदी पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रकाशभाई शहा (पुणे), विदर्भासाठी सुनील बुधवाणी (नागपूर), दक्षिण महाराष्ट्रासाठी सुनील बासरानी (कोल्हापूर), उत्तर महाराष्ट्राकरिता नितीन देशमुख (अहमदनगर), मराठवाड्याकरिता रामदेव व्यास (औरंगाबाद), नाशिक विभागाकरिता नितीन राका (नाशिक) तर खानदेशाकरिता गोकुळ चौधरी (जळगाव) यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी संचालकपदी विनित कुबेर (पुणे), पी. एस. कुलकर्णी (कोल्हापूर), श्रीकांत मांढरे (अहमदनगर), अशोक तोटे (जळगाव), अजिंक्य उजळंबकर (औरंगाबाद), प्रमोद गोसावी (सांगली), राहुल देशपांडे (सातारा), सचिन गिते (नाशिक), निशांत पोरे (सोलापूर) तर सल्लागार मंडळात संस्थापक अध्यक्ष अमरदीप पाटील (कोल्हापूर), मावळते अध्यक्ष मोतीराम पिंगळे (नाशिक), संदीप जव्हेरी (सोलापूर), विनित कुबेर (पुणे) आणि मोहन कुलकर्णी (कोल्हापूर) यांची एकमताने निवड करण्यात आली.
सुरुवातीला पुणे येथील ‘रामा’ या जाहिरात संघटनेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी सर्वांचे स्वागत केले. विनित कुबेर यांनी प्रास्ताविक केले तर संदीप झवेरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाशभाई शहा व विनित कुबेर यांनी या सर्वसाधारण सभेच्या संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यानंतर मावळते अध्यक्ष मोतीराम पिंगळे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. तर मावळते सहसचिव प्रशांत कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर कोरोनाच्या काळात आणि त्यापूर्वीची दोन वर्षे अशी एकूण चार वर्षे ‘फेम’साठी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल मावळते अध्यक्ष मोतीराम पिंगळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर 2022 ते 2024 या कालावधीसाठी नवीन समितीची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी नुतन अध्यक्ष महेश कराडकर यांनी ‘फेम’च्या माध्यमातून जाहिरात व्यवसाय व जाहिरात संस्था बळकट होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर जिल्हा जाहिरात संघटना नसलेल्या ठिकाणी संघटना उभ्या करण्यासाठी फेमच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे मत व्यक्त केले. दुपारच्या सत्रात अभिमन्यू तडवळकर यांचे ‘भवितव्य डिजिटल मार्केटींगचे’ या विषयावर सखोल माहिती देणार्या प्रात्यक्षिकासह व्याख्यान संपन्न झाले. शेवटी नुतन सरचिटणीस संजीव चिपळूणकर यांनी आभार प्रदर्शन केले.