नाशिक – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी आहे. त्याअगोदर माजी सभापती ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांनी विद्यमान अध्यक्ष डॅा. तुषार शेवाळे यांना पत्र लिहून गंभीर प्रश्न उपस्थिती केले आहे. त्यांनी हे पत्र प्रसिध्दीस सुध्दा दिले आहे. काय आहे या पत्रात ते बघा….
प्रति
मा. अध्यक्ष
डॉ तुषार शेवाळे
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, संस्थेच्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये खालील प्रश्न देत आहे त्याची उत्तरे वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात यावी ही विनंती
१– संस्थेच्या वार्षिक अहवालामध्ये सर्व काही आर्थिक गोषवारा व संस्थेच्या इतर कामकाजाबाबत संपूर्णपणे माहिती दिली असतानाही सरचिटणीस यांचेकडून शिक्षक वर्गाकडून तयार केलेल्या पॅावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रास्ताविक करताना जाणीवपूर्वक सभासदांचा दीड ते दोन तास वेळ घेतला जातो त्या ऐवजी मागील सभेचे इतिवृत्त मंजूर झाल्यानंतर लागलीच सभासदांना त्यांचे शंका व प्रश्न विचारण्यासाठी पूर्ण वेळ देण्यात यावा
२-संस्थेच्या शतक महोत्सवच्या काळामध्ये संस्थेचे ज्येष्ठ सभासद व सामाजिक योगदान असलेले एक अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ अभिमन्यू सूर्यवंशी यांनी संस्थेच्या इतिहास म्हणजेच ” शतपर्व ” नावाचा ग्रंथ लिहिला होता त्याचे प्रकाशन न करता सध्या संस्थेतील काही शिक्षकांच्या माध्यमातून संस्थेचा नवीन इतिहास लिहिण्याचे काम सुरू केले आहे ? ” शतपर्व ” ग्रंथ प्रकाशित न करता नवीन स्वकेंद्रित इतिहास लिहिण्याचा हेतू काय ?
३- सिन्नर महाविद्यालयातील एका तीन चार महिन्यापूर्वी मयत झालेल्या सेवकाची बदली केली जाते याबाबत दैनिक देशदूत मध्ये आलेली बातमीने संस्थेची बदनामी झाली नाही काय ? संस्थेत सेवा करत असलेल्या सेवकांची माहिती आपल्या मध्यवर्ती कार्यालयाच्या दप्तरी नाही काय ?
४. 15 ऑगस्ट 2017 पासून आज पर्यंत वारसा हक्काने नवीन किती सभासद झालीत ? त्यांची नावे गाव व तालुका सह वार्षिक अहवालात प्रसिद्ध का केली नाही ? अनेक वेळा मागणी केल्यानंतर सुद्धा प्रसिद्ध का केली जात नाही ? संस्थेचे प्रा नानासाहेब दाते हे विद्यमान संचालक असून त्यांनी संस्थेच्या सभासद करण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ प्रोसीडींग लिहिण्यामध्ये जाणून-बुजून केलेल्या चुका व रिकाम्या ठेवलेल्या जागा संदर्भात व लपवाछपवी केलेली आहे व अशा प्रकारचे आरोपपत्र आपल्या कार्यालयास दिलेले आहे याबाबत आपले स्पष्टीकरण द्या
५– संस्थेचे विद्यमान संचालक नानासाहेब दाते यांनी संस्थेचा ऑडिट रिपोर्ट सर्व प्रकारच्या त्रुटी म्हणजेच शक सह मागितला होता परंतु त्यांना तो देण्यात आला नाही तशा प्रकारचे लेखी पत्र त्यांनी संस्थेला म्हणजेच सरचिटणीस यांना दिले आहे अशाप्रकारे जबाबदार असलेल्या विश्वस्त म्हणजे संचालक यांना ऑडिट रिपोर्ट का दिला नाही ? ऑडिट रिपोर्ट संचालकांना न देता विशेष सर्वसाधारण सभा घेणे कितपत योग्य आहे ? याबाबत आपले स्पष्टीकरण सर्वसाधारण सभेस देण्यात यावे चॅरिटी कायद्यानुसार कोणत्याही सभासदाने मागितल्यास त्यास ऑडिट रिपोर्ट देणे हे संस्थेची जबाबदारी व संस्थाचालकांना बंधनकारक आहे
६- दहा वर्षापूर्वी उदोजी कॅम्पस करता मास्टर प्लॅन बनविला होता व त्या दृष्टीने विविध प्रकारचे बिल्डिंग बांधकाम का केले नाही ? तसेच पॉलीटेक्निक सारख्या महाविद्यालय करता जवळजवळ वीस ते पंचवीस कोटी रुपयांची अतिरिक्त जागा वाया घालवली याबद्दल आपण स्पष्टीकरण देण्यात यावे
७- टीडीआर माध्यमातून संस्थेला संस्थेला मिळालेल्या साडे एकवीस कोटी ठेवींचा विनियोग केला आहे का? केला असल्यास कोणत्या कामकाजा साठी तसेच त्याचा जर विनियोग केला असेल किंवा ठेवींवर गहाण कर्ज घेतले असेल तर तर संस्थेच्या आर्थिक अहवालात त्याची नोंद किंवा उल्लेख का केला नाही ?
८- संस्थेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री दिवंगत डॉ. दौलतराव आहेर यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील उल्लेखनीय कामकाज तसेच आरोग्य विद्यापीठ स्थापनेत असलेल्या योगदान व त्यांच्या सामाजिक कार्याची जाणीव म्हणून संस्थेतील एखाद्या उचित महाविद्यालयास यांचे नाव देण्यात यावे , त्याचप्रमाणे संस्थेचे माजी सरचिटणीस व लोकनेते मालोजीकाका मोगल यांचे सुद्धा उचित महाविद्यालयास किंवा निफाड तालुक्यातील एखाद्या मोठ्या शाळेला नाव देण्यात यावे तसेच मखमलाबाद येथील सहकार महर्षी पोपटरावजी पिंगळे यांचे नामकरण करण्यासंदर्भात त्यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी दिवंगत सरचिटणीस डॉक्टर वसंतराव पवार यांनी जाहीर केले होते की मखमलाबाद महाविद्यालयाला स्वर्गीय पोपटराव पिंगळे यांचे नाव देऊ, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही जाणीवपूर्वक केली नाही याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे
९ – मयत झालेल्या सेवकांचे तसेच सेवा निवृत्त सेवकांची नावे अहवालामध्ये दिली जातात , परंतु निधन झालेला जनरल सभासदांची नांवे दिली का जात नाही ? त्याचप्रमाणेकोरोना संसर्ग काळामध्ये ज्या ज्या सभासदांचे निधन झालेले आहे त्यांचा साधा उल्लेख व त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांची नावे वार्षिक अहवालात का टाकली नाहीत ?
१०– गेली चार-पाच वर्षांमध्ये संस्थेच्या माध्यमातून किती विद्यार्थी आयपीएस , आयएएस व एमपीएससी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाली ? त्यांचा उचित गौरव व अहवालामध्ये उल्लेख का केला
नाही ?
११- मागील चार वर्षांमध्ये विनाअनुदानित शाखांवर किती शिक्षकांची व सेवकांची नेमणूक केली ? कारण अहवालात उल्लेख केल्या प्रमाणे संस्थेतील अनेक शाखा वणी ,खेडगाव ,लोहणेर ताहराबाद ,येवला येथे आदर्श प्रायमरी व आयटीआय सारख्या शाखांमध्ये विद्यार्थी संख्या शून्य ते पाच पर्यंत असताना या अनेक शाखांमध्ये सेवकांची संख्या चार ते पाच आहे ११- महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ना यशोमती ठाकूर यांना संस्थेचे सभासदत्व बहाल करण्यात आले खरं तर घटनेमध्ये नासिक जिल्ह्याबाहेरील सभासदत्व करायचे नाही असे नमूद असतानाही त्या जन्माने नाशिक जिल्हा बाहेरच्या असतांना सुद्धा त्यांना सभासदत्व बहाल करण्यात आले त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यात यावे परंतु शहरातील दिवंगत सभासद सिताराम लक्ष्मण मगर यांच्या जागेवर वारसा हक्काने त्यांची सुनबाई संगीता नितीन मगर यांचा अधिकार असतांना व सर्व प्रकारचे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सुद्धा तसेच तसेच नाशिक जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय विजय करंजकर यांचे चुलते दिवंगत दत्तात्रेय कोंडाजी करंजकर हे सभासद होते , त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्र व इच्छा पत्रा मध्ये त्यांचे बंधू किसन कोंडाजी करंजकर यांचे चिरंजीव म्हणजेच विजय आप्पा करंजकर यांना सभासदत्व करण्या करिता अधिकृत स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर डॉक्युमेंट करून दिलेले होते तरी सुद्धा गेले दोन वर्षापासून त्यांना सभासद करण्यापासून वंचित का ठेवले ? ( चुलताच्या सभासद वारसा म्हणून पुतण्याला सभासद केल्याच्या अनेक घटना संस्थेमध्ये झालेल्या आहेत )
१२- संस्थेच्या नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमध्ये करंट अकाउंट मध्ये किती कोटी रुपये पडून आहे व गोदावरी बँकेत सरचिटणीस यांचे हितसंबंध असताना ही संस्थेच्या किती ठेवी तेथे ठेवल्या आहेत व करंट अकाउंट मध्ये किती रुपये आहेत ?
१३– संस्थेमधील विविध विना अनुदानित शाखांमधील सेवकांच्या पगारा करिता 136 कोटी रुपये खर्च करण्यात आले किंबहुना त्याचा गाजावाजा केला जातो , परंतु या सर्व शाखांमधून विद्यार्थी फी व इमारत निधी जवळजवळ 150 कोटी रुपये जमा झालेली आहे( संदर्भ अहवाल पेज क्रमांक 129 ,134 ,135 ,139 ,150 ) एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फी जर वसूल केली जाते तर सभासद पाल्यांना फी माफी का दिली जात नाही ?
१४- संस्थेचे विद्यमान संचालकका कडून मिळालेल्या माहिती नुसार ऑनलाइन टिचिंग करिता विविध प्रकारचे सॉफ्टवेअर घेण्याकरिता एका एजन्सीला 29 लाख 47 हजार रुपये ॲडव्हान्स दिला होता , त्यामध्ये कार्यकारी मंडळाचा ठराव न करता सरचिटणीस यांनी परस्पर अशा प्रकारचा उद्योग करण्याचे कारण काय ? तसेच सदर एजन्सीने अशा कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर संस्थेला पुरवले नाही सदर रक्कम त्या एजन्सी करून परत घेतली काय ? १५ – संस्थेच्या मेडिकल कॉलेज मध्ये कार्यकारी मंडळाचे ठराव नसताना व अधिकार नसताना सरचिटणीस व शिक्षणाधिकारी यांनी संगनमताने दहा ते वीस लाख रुपये पर्यंतचे अनेक कामांचे जवळजवळ दहा कोटी रुपयांचे ॲडव्हान्स परस्पर देण्यात आलेले आहे
या सर्व प्रश्नांची उत्तरे शांत पणे देण्यात यावी आपले प्रेझेन्टेशन बाजूला ठेवून
ॲड नितीन बाबुराव ठाकरे
माजी सभापती
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक
प्रत माहितीसाठी
सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ