नाशिक – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अॅड. नितीन ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अॅड. ठाकरे हे मविप्रचे माजी सभापती तर नाशिक वकील संघाचे अध्यक्ष आहेत. उर्वरित कार्यकारिणी मध्ये प्रा. अशोक पिंगळे (सचिव) विक्रांत मते (कोषाध्यक्ष ) तर राजेंद्र डोखळे, मनीष लोणारी, सुरेखा बोराडे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशाने कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी ठाकरे यांना नियुक्तीचे पत्र दिले.
२५ नोव्हेंबर १९८४ रोजी यशंवतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांचे हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी यशवंतरावांचे अनुयायी, सुहृद व कार्यकर्ते एकत्र आले. त्यातूनच १७ सप्टेंबर १९८५ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली. महाराष्ट्राच्या जनमानसाला सचिंत करणाऱ्या प्रश्नांचा खल करावा आणि या चर्चेतून कार्य करणारी माणसे तयार व्हावीत ही प्रतिष्ठानची भूमिका आहे. अशा प्रतिष्ठाणवर ही निवड झाली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून नव्या कार्यकारीचे अभिनंदन होत आहे.









