नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सरचिटणीसपदी व नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी झालेली निवड यासाठी अॅड. नितीन ठाकरे यांचा नागरी सत्कार व मजल दरमजल या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता महाकवी कालिदास कला मंदिर येथे होणार आहे. गौरव संघर्षाचा..सन्मान कार्यकर्तृत्वाचा अशी टॅग लाईन वापरत नाशिक बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी अॅड. जयंत जायभाव यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांची नागरी सत्कार समिती बनवण्यात आली आहे. हा भव्य नागरी सत्कार सोहळा मो. स. गोसावी सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पालकमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सत्कार समितीचे अध्यक्ष अॅड.. जयंत जायभावे, अॅड.विलास लोणारी, अॅड. अविनाश भिडे, शैलेस गोसावी, अॅड. सुरेश भटेवरा, हेमंत धात्रक, डॅा. अभिमन्यू पवार, डॅा. अनिरुध्द धर्माधिकारी, डॅा. विक्रांत जाधव, आ. जयंत जाधव, सीए राजाराम बस्ते, आर्कि, धनंजय शिंदे, सलिम शेख, विलास शिंदे, परवेझ कोकणी, दीपक बागड, समन्वयक डॅा. अशोक पिंगळे, अजय निकम, अॅड. जालिंदर लाडगे, अॅड.. उत्तम आभाळे, गौरवग्रंथाचे आयोजक अॅड.. वैभव शेटे, अॅड.. हेमंत गायकवाड, अॅड. संजय गिते, अॅड. सोनल गायकर, अॅड. कमलेश पाळेकर, अॅड.. शिवाजी शेळके, अॅड. प्रतीक शिंदे, अॅड.. महेश यादव, अॅड. आश्विनी गवते, अॅड.. वैभव घुमरे यांनी केले आहे.