इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आज अर्थसंकल्पयीय अधिवेशनाला विधिमंडळात सुरुवात झाली आहे. या अधिवेशनापूर्वी विरोधकांनी आज जोरदार घोषणाबाजी करत मंत्री धनजंय मुंडे व माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आज सभागृहात जाण्यापूर्वी महाराष्ट्र में दो है गुंडे, कोकाटे – मुंडे – कोकाटे मुंडे! अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्यानंतर विरोधकांचे राजीनाम्यासाठी आंदोलनही केले. मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी आज विधानभवन परिसरात हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडही बेड्या घालूनच विधिमंडळ परिसरात आले. त्यांनी विविध मागण्या करत सर्वांचे लक्ष वेधले.