मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपने ठाकरे गटाला प्रचंड अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते. या विजयानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे!
ह्या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे!, असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी बघा खालील व्हिडिओ
https://twitter.com/AUThackeray/status/1589179355628175362?s=20&t=QrneK4w6WB89auMmZygCiQ
Aditya Thackeray Reaction on Rutuja Latake Win