मुंबई ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे हे उद्या १ ऑगस्टला दोन दिवसाच्या कोल्हापूर दौ-यावर जाणार आहे. उद्या ते दुपारी मुंबईहून सायंकाळी कोल्हापूरला जातील. येथे ते सुरुवातीला अंबाबाईचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजता मिरजकर तिकटीला त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोर शिवसेना शहरप्रमुख रवी इंगवले यांच्या कार्यालयाही भेट देणार आहेत. त्याचबरोबर युवा सेना पदाधिकारी मंजित माने यांनी तयार केलेल्या सेल्फी पाँईंटचे उद्घाटन करतील. हर्षल सुर्वे यांच्या संपर्क कार्यालयाचेही उद्घाटन होणार आहे. उद्या कोल्हापुरात मुक्काम केल्यानंतर ते मंगळवारी शिरोळ दौऱ्यावर जाणार आहेत. जयसिंगपूरमध्ये सकाळी सभा घेतल्यानंतर ते सातार दौऱ्यावर रवाना होणार असल्याची माहिती शिवसेनेतर्फे देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे विविध ठिकाणी महाराष्ट्रात दौरा करत आहे. अगोदर त्यांनी नाशिक व औरंगाबाद दौरा केला आता ते पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेही शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे या दौ-यात पुन्हा एकदा शिवसेनेची बांधणी केली जाणार आहे.