मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज एक खुले आव्हान दिले आहे. राज्यात सध्या औद्योगिक विकासाबाबत मोठी चर्चा होत आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेले प्रकल्प गुजरातमध्ये पळविले जात असल्याचे आरोप होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशामुळेच हे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याचे महाविकास आघाडी सरकारचे नेते सांगत आहेत. आता याप्रश्नी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, मी घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज करतो, की माझ्याशी उद्योग या विषयावर वन ऑन वन डिबेट करावे. म्हणजेच, एकाच व्यासपीठावर येऊन समोरासमोर विविध प्रश्नांची उत्तरे द्यावी आणि खुलेपणाने चर्चा करावी, असे ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. हे आव्हान शिंदे स्विकारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
https://twitter.com/ShivsenaComms/status/1587087943927500801?s=20&t=-sfSgl6mjo0_DL81OaNKew
Aditya Thackeray Challenge to CM Eknath Shinde