इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे. या चित्रपटातील प्रभू राम, सीता यांच्या लूकवरून खूप गदारोळ झाला होता. या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर रामायण पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे समोर आले आहे. आपल्या मराठी रसिकांसाठी ही अभिमानाची बाब आहे. कारण या चित्रपटाचे संगीतकार आहेत अजय – अतुल. शनिवारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी संगीतकार अजय आणि अतुल गोगावले यांच्यासह चित्रपटाचे पहिले गाणे ‘जय श्री राम’ रिलीज केले.
गाण्याचा अनुभव अत्यंत वेगळा
‘जय श्री राम राजा राम’या ‘आदिपुरुष’चित्रपटातील गाण्याचे गीतकार मनोज शुक्ला आहेत. याबाबत आता संगीतकार अजय-अतुलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत अनोख्या पद्धतीने पहिले गाणे रिलीज करता यावे यासाठी ‘आदिपुरुष’च्या टीमने विशेष तयारी केली होती. अजय – अतुल यांच्यासह ३० जणांच्या कोरस टीमने या गाण्याचा लाईव्ह परफॉर्मन्स दिला. त्यानंतर हे गाणे लॉंच करण्यात आले. “जय श्री राम” या गाण्याच्या नावामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. ‘आदिपुरुष’मधील हे गाणे आम्ही सर्वात आधी संगीतबद्ध केले. आम्हाला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा सगळी माहिती घेतली. गाण्याला संगीत देताना आम्ही जेव्हा श्री रामाचे नाव ऐकले तेव्हा आमच्यात वेगळीच शक्ती आणि भक्ती निर्माण झाली होती,” अशा भावना संगीतकार, गायक अजय यांनी व्यक्त केल्या. गाण्याला मिळत असलेल्या प्रेमामुळे आम्ही अवाक झालो आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
https://twitter.com/rajeshnair06/status/1660200391319998464?s=20
१६ जूनला भेटीला
मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. १६ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे. ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर आता गाण्याची चर्चा आहे.
२४ तासांत करोडो व्ह्यूज
या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले असून ट्रेलरप्रमाणेच चित्रपटाच्या गाण्याने देखील नवा रेकॉर्ड केला आहे. या गाण्याला अवघ्या २४ तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळाल्या असून या गाण्याचा व्हिडीओ एका दिवसात यूट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ बनला आहे. एका नेटकऱ्यानं या गाण्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘गाणं ऐकल्यानंतर अंगावर शहारे आले, असं तो म्हणतो तर दुसऱ्या युझरनं युट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या गाण्याला कमेंट केली, ‘हे केवळ गाणं नाहीये, या भावना आहेत,’ असे म्हटले आहे.
Adipurush shriram song ajay atul Music