नाशिक – महाराष्ट्र राज्य शासकीय दुकाने निरीक्षक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकरोड येथे जैन भवन येथे रविवारी संपन्न झाले. अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी कामगार उप आयुक्त विकास माळी, सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती शर्वरी पोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष विशाल जोगी प्रमुख कार्यवाहक प्रशांत वंजारी तसेच सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून दुकान निरीक्षक हजर होते. याप्रसंगी सतिष अहिरे, संघटनेचे संस्थापक व माजी अध्यक्ष मुजीब शेख, संघटनेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार तसेच आर्यन पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विकास माळी कामगार उपायुक्त यांनी सर्वांना अमूल्य मार्गदर्शन केले. संघटनेचे अधिवेशन विशाल जोगी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.