मुंबई – नाशिक येथील अभिनव भारत मंदिर याचे नुतनीकरण करावे याची मागणी १९६८ झाली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा विषय आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला या प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात एक कोटी रुपयांचा निधी दिला गेला व त्यानंतर कार्यारंभ आदेश देऊन काम प्रगतिपथावर आहे.
अभिनव भारत मंदिर ला अतिरिक्त पाच कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून आमदार देवयानी फरांदे यांनी मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत याबाबतचा प्रस्ताव १८ मे २०१८ रोजी आमदार देवयानी फरांदे यांच्या मागणीनुसार देण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सदर कामाला पाच कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू होता. अधिवेशनात देखील मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी करण्यात आली. परंतु खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबतची कोणतीही प्रक्रिया न करता अभिनव भारत मंदिर ट्रस्टला भेट देखील न देता परस्पर मंजूर झालेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयातून नव्याने प्रस्ताव देखील देण्यात आलेला नाही. कोणतेही काम न करता याबाबतचे वृत्त वृत्तपत्रातून प्रसिद्धीस दिलेले आहे. खासदार हेमंत गोडसे यांचे हे वृत्त खोडसाळपणाचे व श्रेय लाटण्याचा दुर्दैवी प्रयत्न असून खासदार हेमंत गोडसे यांनी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न न करत जनतेची कामे करावी असा सल्ला आमदार देवयानी फरांदे यांनी दिलेला आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत या विषयाला वाचा फोडली असता निधी आमदार् फरांदे यांनाच दिला जाणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.